कुलभूषण जाधव यांना उद्या मिळणार भारतीय दुतावासाची मदत

आयसीजेच्या निर्देशानंतर पाकिस्तानाने घेतला निर्णय

कुलभूषण जाधव

हेरगिरी आणि दहशतवादाच्या आरोपाखाली पाकिस्तानातील तुरुंगात असलेले भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना भारतीय दुतावासाची मदत (कॉन्स्युलर एक्सिस) मिळवून देण्यासाठी पाकिस्तान तयार झाला असल्याची माहिती पाकिस्तानी माध्यमांनी दिली आहे. यानुसार  उद्या (शुक्रवार) कुलभूषण जाधव यांना भारतीय दुतावासाची मदत दिली जाणार आहे. त्यामुळे आता कुलभूषण जाधव यांना राजनैतिक मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आयसीजेच्या निर्णयानंतर नरमलेल्या पाकिस्तानने हा निर्णय घेतला असल्याचे दिसत आहे.

हेरगिरी आणि दहशतवादाच्या आरोपाखाली कुलभूषण जाधव यांना सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेचा फेरविचार करावा आणि त्यांना राजनैतिक संपर्काची अनुमती द्यावी, असे निर्देश आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पाकिस्तानला दिले होते. तर, तीन वर्षांपासून कुलभूषण जाधव यांना भारतीय दुतावासाची मदत दिली जावी अशी मागणी केली जात होती.  परंतु, आजपर्यंत पाकिस्तानने जाधव यांना राजनैतिक मदत मिळवून  दिलेली नव्हती.

कुलभूषण जाधव यांना ‘हेरगिरी आणि दहशतवादा’च्या आरोपाखाली पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने एप्रिल २०१७ मध्ये फाशीची शिक्षा सुनावली होती. भारताने या निर्णयाविरोधात ८ मे २०१७ रोजी आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Pakistan offers consular access to kulbhushan jadhav tomorrow msr

Next Story
खोबऱ्याच्या तेलाचा वापर टूथपेस्टमध्ये करणे शक्य
ताज्या बातम्या