मोदी सरकारने केलेल्या इंधन दरकपातीचं इम्रान खान यांच्याकडून कौतुक; म्हणाले, “आता आपल्या देशाला…”

इस्लामाबादमध्ये एक लीटर पेट्रोलची किंमत १७९ रुपये ८६ पैसे झाली असून डिझेलसाठी १७४ रुपये १५ पैसे मोजावे लागत आहेत

pakistan petrol diesel price increased by rs 30 imran khan attacks pakistan government and praises india petrol
इस्लामाबादमध्ये एक लीटर पेट्रोलची किंमत १७९ रुपये ८६ पैसे झाली असून डिझेलसाठी १७४ रुपये १५ पैसे मोजावे लागत आहेत

पाकिस्तानमध्ये सध्या राजकीय घमासान सुरु असताना इंधनाच्या दरात ऐतिहासिक वाढ झाली आहे. पाकिस्तान सरकारने सर्वसामान्यांना झटका देत पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रतीलिटर ३० रुपयांनी वाढवले आहेत. हे दर रात्रीपासून लागू झाले आहेत. यानंतर इस्लामाबादमध्ये एक लीटर पेट्रोलची किंमत १७९ रुपये ८६ पैसे झाली असून डिझेलसाठी १७४ रुपये १५ पैसे मोजावे लागत आहेत. याशिवाय केरोसिनच्या किंमतीतही ३० रुपयांनी वाढ झाली असून दर १५५ रुपये ५६ पैसे झाला आहे.

इम्रान खान यांच्याकडून सरकारवर टीका करताना भारताचं कौतुक

पाकिस्तानमध्ये इंधन दरवाढ झाल्यानंतर माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे तर दुसरीकडे भारत सरकारचं कौतुक केलं आहे.

इम्रान खान यांनी वाढत्या इंधनाच्या दरांवरुन टीका करताना म्हटलं आहे की, “पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत २० टक्क्यांची वाढ करत देशाने आयात केलेल्या सरकारच्या अधीनतेसाठी किंमत मोजायला सुरुवात केली आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी ऐतिहासिक वाढ आहे. आपल्या अकार्यक्षम आणि असंवेदनशील सरकारने रशियाकडून ३० टक्के स्वस्त तेलासाठी केलेल्या कराराचा पाठपुरावा केला नाही”.

पुढच्या ट्वीटमध्ये इम्रान खान यांनी भारताने रशियाकडून स्वस्तात तेल खरेदी केल्याच्या धोरणाचं कौतुक केलं आहे. ते म्हणाले की “याउलट अमेरिकेचा धोरणात्मक सहकारी असलेल्या भारताने रशियाकडून स्वस्तात तेल खरेदी करत इंधनाच्या किंमती २५ रुपयांनी कमी केल्या आहेत. आता आपल्या देशाला बदमाशांच्या हातून महागाईचा आणखी एक मोठा डोस सहन करावा लागणार आहे”.

अर्थमंत्र्यांनी केली घोषणा

पाकिस्तानचे अर्थमंत्री मिफ्ताह इस्माइल यांनी गुरुवारी सरकारने पेट्रोलियम उत्पादनांच्या किंमती ३० ने वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याची घोषणा केली. अर्थमंत्र्यांनी इस्लामाबाद येथे पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसोबत चर्चा फिस्टकल्यानंतर ही इंधन दरवाढ करण्यात आली.

सरकारकडे किंमती वाढवण्याशिवाय अन्य कोणताही पर्याय नसल्याचं इस्माइल यांनी सांगितलं. नव्या दरांमध्ये डिझेलवर आम्हाला प्रतीलिटर ५६ रुपयांचं नुकसान सहन करावं लागत असल्याचंही ते म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pakistan petrol diesel price increased by rs 30 imran khan attacks pakistan government and praises india petrol diesel latest rates sgy

Next Story
मैदानात कुत्रा फिरवण्यासाठी खेळाडूंना बाहेर काढणं IAS दांपत्याला महागात पडलं; गृहमंत्रालयाने पतीची लडाखला केली बदली तर पत्नी…
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी