* १९९६- इम्रान खान यांनी तेहरीक-इ-इन्साफ पक्षाची स्थापना केली. ‘न्यायासाठी चळवळ’ असा या नावाचा अर्थ.

* २००२- निवडणूक जिंकून खान नॅशनल असेम्ब्लीचे सदस्य बनले

* २०१३ – खान पुन्हा नॅशनल असेम्बलीवर निवडून आले

* २०१८- सार्वत्रिक निवडणुकांमध्ये पक्षाला विजय मिळवून दिल्यानंतर इम्रान खान पंतप्रधान बनले

* ३ मार्च २०२१- विरोधी पक्ष नेते व माजी पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांनी पाकिस्तानचे अर्थमंत्री अब्दुल हफीझ शेख यांचा सिनेटच्या निवडणुकीत पराभव केला. ६ मार्च- या पराभवानंतर खान यांनी नॅशनल असेम्बलीत विश्वासदर्शक ठराव जिंकला

* ८ मार्च २०२२- इम्रान खान सरकार महागाईला आळा घालण्यात अपयशी ठरल्याचा ठपका ठेवून विरोधी पक्षांच्या नेत्यांनी त्यांच्याविरुद्ध अविश्वासदर्शक ठराव सादर केला

* २० मार्च- पंतप्रधानांविरुद्धचा अविश्वासदर्शक ठराव विचारात घेण्यासाठी अध्यक्षांनी नॅशनल असेम्ब्लीचे सत्र बोलावले

* २३ मार्च- सत्ताधारी आघाडीच्या मित्रपक्षांचे सरकारच्या वरोधात मतदान करण्याचे संकेत, मात्र आपण राजीनामा देणार नाही यावर खान ठाम

* २५ मार्च- अविश्वासदर्शक ठराव न मांडता नॅशनल असेम्ब्लीचे सत्र लांबणीवर

* २७ मार्च- आपले सरकार उलथून पाडण्याच्या ‘कारस्थानामागे’ आंतरराष्ट्रीय शक्तींचा हात असल्याचा खान यांचा प्रचंड जाहीर सभेत दावा

* २८ मार्च- पीएमएल-एनचे अध्यक्ष शहबाज शरीफ यांनी सभागृहात खान यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव मांडला

* ३० मार्च- प्रमुख मित्रपक्ष विरोधकांना जाऊन मिळाल्याने खान यांनी बहुमत गमावले

* ३१ मार्च- अविश्वास ठरावावर चर्चा करण्यासाठी पाकिस्तान संसदेचे सत्र सुरू

* १ एप्रिल- आपला जीव धोक्यात असल्याचा इम्रान खान यांचा दावा * ३ एप्रिल- उपाध्यक्षांनी अविश्वासदर्शक ठराव रोखला. पंतप्रधान खान यांच्या सल्ल्यावरून अध्यक्ष अलवी यांनी नॅशनल असेम्ब्ली बरखास्त केली