दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यासाठी कोट्यवधी उधळले; इम्रान खान यांचा गौप्यस्फोट

पाकिस्तानच्या पंतप्रधानांनीच दहशतवादाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.

संग्रहित छायाचित्र

दहशतवादी संघटना मुजाहिद्दीनला पाकिस्तानने प्रशिक्षण दिलं आहे. तसंच त्यावर पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेतील 100 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच तब्बल सात लाख कोटी रूपयांचा खर्च केला असल्याचा गौप्यस्फोट खुद्द पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केला आहे. गुरूवारी पाकिस्तानच्या गृहमंत्र्यांनी दहशतवादी पाकिस्तान सरकारच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर आता पाकिस्तानच्या पंतप्रधानांनीच दहशतवादाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.

“80 च्या दशकात सोव्हिएत संघाने अफगाणिस्तानवर ताबा मिळवला होता. त्यावेळी आम्ही मुजाहिद्दिन लोकांना त्यांच्याविरोधात जिहादाचं प्रशिक्षण देत होतो. त्यांना पाकिस्ताननेच प्रशिक्षित केलं आहे. त्यांच्यासाठी अमेरिकेच्या सीआयएकडून (CIA) पैसा पुरवला जात होता,” असं धक्कादायक वक्तव्य इम्रान खान यांनी केलं आहे. “आता एका दशकानंतर अमेरिका अफगाणिस्तानमध्ये दाखल झाला आहे आणि त्याच जिहादींना आता अमेरिकेनं दहशतवादी म्हणण्यास सुरूवात केली आहे,” असंही ते म्हणाले.

“अमेरिकेचं वागणं हा मोठा विरोधाभास आहे. आम्ही आमच्या 70 हजार लोकांना गमावलं आणि देशाच्या अर्थव्यवस्थेतील सात लाख कोटी रूपये गमावले. अखेरिस आमच्या हाती काय लागलं? अमेरिकेने आमच्यावरच अपयशी ठरल्याचा ठपका ठेवला. पाकिस्तानच्या विरोधात झालेला हा अन्याय आहे,” असं इम्रान खान म्हणाले. गुरूवारी एका कार्यक्रमादरम्यान पाकिस्तानचे गृहमंत्री एजाज अहमद शाह यांनी पाकिस्तानने जमात-उल-दावावर अब्जावधी रूपयांचा खर्च केल्याचं म्हटलं होतं. तसंच या दहशतवादी संघटनांना मुख्य प्रवाहात आणण्याचा इम्रान खान सरकारचा प्रयत्न असून दहशतवाद्यांना नोकरी आणि पैसे पुरवण्याची जबाबदारी सरकारने उचलली पाहिजे असंही ते म्हणाले होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Pakistan pm imran khan spent 7 lakh crore for training mujahideen jud

Next Story
चीनमधील भूकंपात ५० ठार, १५० जखमी
ताज्या बातम्या