पीटीआय, वॉशिंग्टन : पाकिस्तानच्या लष्कराने १९७१ मध्ये तत्कालीन पूर्व पाकिस्तानमध्ये बंगाली नागरिक व हिंदूंच्या विरोधात केलेल्या अमानुष अत्याचारांना ‘नरसंहार’ ठरवावे, अशी विनंती अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांना अमेरिकेच्या प्रतिनिधी गृहातील दोन प्रभावशाली सदस्यांनी कली आहे. तसा प्रस्ताव त्यांनी प्रतिनिधी गृहात मांडला आहे. तसेच या अत्याचारांबद्दल बांगलादेशवासीयांची माफी मागावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. भारतीय वंशाचे अमेरिकेचे प्रतिनिधी गृह सदस्य रो खन्ना आणि सीव चाबोट यांनी शुक्रवारी प्रतिनिधी गृहात हा प्रस्ताव मांडला. त्यात नरसंहारासाठी पाकिस्तानी सरकारने बांगलादेशाच्या नागरिकांची माफी मागण्यास सांगितले आहे. रिपब्लिकन पक्षाचे सदस्य चाबोट यांनी ट्वीट केले, की अनेक वर्षे जरी उलटली, तरी

या नरसंहारात मारल्या गेलेल्या लाखो नागरिकांचा आपल्याला विसर पडता कामा नये. या नरसंहाराची जबाबदारी स्वीकारण्यासारख्या प्रकारांमुळे ऐतिहासिक दस्तावेजीकरण होते. अमेरिकेचे नागरिक त्याविषयी सजग होण्यास मदत होते. तसेच भविष्यात असे अत्याचार करू पाहणाऱ्यांना अशा गुन्ह्यांसाठी माफ अथवा विसरले जाणार नाही, असा इशारा मिळतो. तत्कालीन पूर्व पाकिस्तानात (सध्याचा बांगलादेश) १९७१ मध्ये मोठा नरसंहार झाला होतो. ओहायोच्या ‘फस्र्ट डिस्ट्रिक्ट’चे माझे हिंदू सहकारी रो खन्नांच्या मदतीने मी बंगाली नागरिक व हिंदूंचा १९७१ मध्ये झालेल्या अत्याचाराला ‘नरसंहार’ संबोधण्याचा प्रस्ताव दिला आहे. या मृत्यमुखी पडलेल्यांमध्ये ८० टक्के हिंदू होते. बांगलादेश समूहाने या प्रस्तावाचे स्वागत केले.