लख्वीचा जामीन सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द

मुंबईवर २००८ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड झाकिउर रहमान लख्वी याला मंजूर करण्यात आलेला जामीन सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी रद्दबातल ठरवला.

मुंबईवर २००८ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड झाकिउर रहमान लख्वी याला मंजूर करण्यात आलेला जामीन सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी रद्दबातल ठरवला. यामुळे लख्वी याला तुरुंगातच राहावे लागणार आहे.
२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा कट आखणे आणि हल्ला घडवून आणण्यात साह्य़ करणे, असे आरोप लखवी याच्यावर ठेवण्यात आले आहेत. हल्ल्यातील सात आरोपींपैकी लख्वी हा एक आरोपी आहे. गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात पाकिस्तानातील दहशतवादविरोधी न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला होता. त्यानंतर पाकिस्तान सरकारने सार्वजनिक शांततेच्या कलमाखाली लख्वीला ताब्यात घेण्याचे आदेश दिले. मात्र, इस्लामाबाद उच्च न्यायालयाने हे आदेश स्थगित करीत लख्वीला जामीन मंजूर केला.
लख्वीला जामीन मंजूर झाल्यानंतर त्याविरोधात भारतात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. संसदेनेही याचा कडक शब्दांत निषेध केला होता. एक दशलक्ष रुपयांचा जातमुचलका भरणे आणि मुंबई हल्ल्यांसंबंधी तेथे सुरू असलेल्या खटल्याच्या प्रत्येक सुनावणीला हजर राहणे या अटींवर इस्लामाबाद उच्च न्यायालयाने लख्वीला तुरुंगातून सोडण्याचे आदेश दिले होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Pakistan supreme court overturned the order granting bail to lakhvi