पाकिस्तान रुपयाचे मूल्य डॉलर्सच्या तुलनेत आत्तापर्यंतच्या सर्वात खालच्या स्तरावर येऊन पोहचले आहे. एका डॉलर्सच्या समोर पाकिस्तानला १८८.३५ रुपये मोजावे लागत आहेत. श्रीलंकेप्रमाणे पाकिस्तानच्या चलनाचे मुल्य डॉलर्सच्या समोर मोठ्या प्रमाणात घसरले आहे. आज सकाळी ८२ पैशांनी पाकिस्तान रुपया डॉलर्सच्या तुलनेत घसरला.

पाकिस्तानमधील अस्थिर राजकीय परिस्थिती, ढासळलेली अर्थव्यवस्था, महागाई, इंधनाच्या वाढत्या किंमती यामुळे पाकिस्तानचे पेकाट मोडले आहे. असं असतांना पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे मदत मागितली. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनेही ६ अब्ज डॉलर्स देण्याची तयरी दर्शवली होती. यासाठी काही प्रमाणात आर्थिक शिस्त पाळण्याच्या सूचना या पाकिस्तानला केल्या होत्या. विशेषतः इंधन आणि वीजेवर असलेली सवलत मोठ्या प्रमाणात कमी कराव्यात असं नाणेनिधीने स्पष्टपणे पाकिस्तानला सांगितले होते. दरम्यान पाकिस्तामध्ये सत्तांतर झाल्यावरही हे बदल होऊ शकले नाहीत. यामुळे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनेही पाकिस्तानला अपेक्षित असलेला अर्थपुरवठा थांबवला. यामुळे पाकिस्तानच्या अडचणीत भर पडली आहे.

Operation Meghdoot, Siachen,
विश्लेषण : पाकिस्तानला चकवा देत सियाचिनवर कब्जा… थरारक ‘ऑपरेशन मेघदूत’ मोहीम कशी फत्ते झाली?
Mohammad Amir and Imad Wasim Returns to Pakistan National Team
फिक्सिंग, बंदी आणि निवृत्तीनंतर मोहम्मद आमिर पुन्हा पाकिस्तानच्या टी-२० संघात
Indian Navy
भारतीय नौदलाची मोठी कारवाई; समुद्री चाच्यांच्या तावडीतून २३ पाकिस्तानी नागरिकांची केली सुटका
India Vs Pakistan bilateral series
IND vs PAK : भारत आणि पाकिस्तान यांच्यात मालिका होणार? क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आयोजनासाठी व्यक्त केली इच्छा

विदेशी चलन साठाही पाकिस्तानमधील कमी झाला असून पुढील काही दिवस काढता येतील अशी परिस्थिती आहे. त्यात आता अन्नधान्याचे संकटही पाकिस्तानसमोर येऊन ठेपले आहे. गहूचे उत्पादन मोठ्या प्रमाणात यावर्षी कमी झाल्याने आणखी एक अडचणीचा डोंगर पाकिस्तानसमोर उभा राहीला आहे.