दिग्गज गायिका आणि भारतरत्न लता मंगेशकर यांचे रविवारी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले. लता मंगेशकर यांच्या निधनाने संगीताच्या एका युगाचा अंत झाला असून त्यांचा प्रत्येक चाहता आज दु:खात आहे. आहे. लतादीदींच्या निधनाचा शोक केवळ भारतातच नाही, तर जगभरात आहे. पाकिस्तानातही याला अपवाद नाही. पाकिस्तानातील अनेक राजकीय नेत्यांनी लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारण मंत्री फवाद चौधरी यांनी लता मंगेशकर यांना श्रद्धांजली अर्पण केली. दीदींचं जाणं हा “एका युगाचा अंत” असं त्यांनी म्हटलंय. “लतादीदी या दशकानू दशके संगीत जगतावर राज्य करणारी एक गानसम्राज्ञी होत्या,” असं त्यांनी म्हटलंय.

पाकिस्तानी लष्कराचे प्रमुख जनरल कमर बाजवा यांचे वैयक्तिक सल्लागार असल्याचा दावा करणाऱ्या ‘झैदू’ नावाच्या ट्विटर युजरने म्हटलं की, “एक हजार पाकिस्तानही लतादीदींच्या जाण्याचं नुकसान भरून काढू शकत नाहीत.”

लेखिका आणि स्तंभलेखक दुर्दाना नजम यांच्या म्हणण्यानुसार, “म्युझिकल नाइटिंगेल” लता मंगेशकर भारत आणि इतर ठिकाणांप्रमाणेच पाकिस्तानातही प्रसिद्ध होत्या. पाकिस्तानचे राजकीय विश्लेषक डॉ. शाहिद मसूद यांनीही मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली, एका युगाचा अंत म्हणत त्यांनी लतादीदींना “आमची प्रिय बहिण” असे संबोधले होते.

पाकिस्तानी अभिनेता इम्रान अब्बास आणि गायिका हुमैरा अर्शद यांनीही हम न्यूज या पाकिस्तानी वृत्तवाहिनीवर लता मंगेशकर यांच्या निधनावर प्रतिक्रिया दिली.

लतादीदींच्या निधनाबद्दल पाकिस्तानातूनही श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम, मोहम्मद हाफीज, वकार युनूस, पीसीबी अध्यक्ष रमीझ राजा यांनी लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने ट्वीट करून लिहिले, ‘सुवर्ण युगाचा शेवट. लताजींचा जादुई आवाज, त्यांचा वारसा लाखो लोकांच्या हृदयात जिवंत राहील. एक अनोख्या आयकॉन.” पाकिस्तानी क्रिकेटर मोहम्मद हाफीजने लता मंगेशकर यांचा फोटो ट्वीट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pakistanis mourn lata mangeshkar too says even 1000 pakistan cannot compensate this loss hrc
First published on: 06-02-2022 at 19:28 IST