अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षात मध्यस्थी करण्यासाठी आपण तयार असल्याचा दावा पाकिस्तानने केला होता. मात्र या ऑफरनंतर इराणने पाकिस्तानच्या नेतृत्वाखाली अशा कोणत्याही मध्यस्थीच्या प्रयत्नांमध्ये आपला सहभाग स्पष्टपणे नाकारला आहे.

मुंबईतील इराणचे कॉन्सुलेट जनरल यांनी सोमवारी स्पष्ट केले की, अमेरिकेबरोबर कोणतीही थेट चर्चा झालेली नाही. तर फक्त मध्यस्थांमार्फत अवाढव्य आणि गैरवाजवी मागण्या समोर ठेवण्यात आल्या आहेत. दूतावासाने पाकिस्तानचे फोरम्स ही त्यांचे स्वतःचे आहेत आहेत आणि इराणने त्यात कोणताही सहभाग घेतलेला नाही, असेही स्पष्ट केले आहे.

“अमेरिकेबरोबर कोणतीही थेट चर्चा झालेली नाही; फक्त मध्यस्थांमार्फत अवाढव्य, गैरवाजवी मागण्या मांडण्यात आल्या आहेत. अमेरिकेची डिप्लोमसी सातत्याने बदलते; आमची भूमिका मात्र स्पष्ट आहे. पाकिस्तानचे फोरम्स हे त्यांचे स्वत:चे आहेत; आमच त्यात सहभाग नाही. युद्ध संपवण्यासाठी प्रादेशातून होणार्‍या आवाहनाचे स्वागत आहे, पण हे युद्ध कोणी सुरू केले हे लक्षात ठेवा!” असे इराणच्या कॉन्सुलेट जनरलनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी इस्लामाबादमध्ये सौदी अरेबिया, इजिप्त आणि तुर्कीच्या परराष्ट्रमंत्र्यांबरोबर अनेक तास चर्चा केली, त्यानंतर रविवारी पाकिस्तानकडून संबंधित घोषणा करण्यात आली हो

“इशाक दार यांनी असा दावा केला की, त्यांनी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी इराणच्या वरिष्ठ सरकारी मंत्र्यांशी, तसेच राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान आणि परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांच्याशी अनेकदा फोनवरून चर्चा केली आहे.”

होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणाऱ्या जलवाहतूकीतील अडथळा यासह संघर्षाचे परिणाम यावर या मंत्र्यांनी चर्चा केली. टीव्हीवर प्रसारित करण्यात आलेल्या आपल्या निवेदनात दार म्हणाले की, या बैठकीसाठी आलेल्या परराष्ट्रमंत्र्यांनी अमेरिका-इराण यांच्यातील संभाव्य चर्चा इस्लामाबादमध्ये होण्यास आपला पूर्ण पाठिंबा दर्शवला आहे.

दार यांनी दावा केला की त्यांनी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी इराणच्या वरिष्ठ सरकारी मंत्र्यांशी, तसेच राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान आणि परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांच्याशी अनेकदा फोनवरून चर्चा केली आहे. तसेच पाकिस्तानची अमेरिकेच्या प्रशासनाशीही सक्रियपणे चर्चा सुरू असल्याचेही ते म्हणाले.

मात्र इस्लामाबाद येथे रविवारी अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्थेत पार पडलेल्या या बैठकीत अमेरिका, इस्रायल किंवा इराण यांपैकी कोणत्याही देशाचा प्रतिनिधी उपस्थित नव्हता.

इराणच्या Tasnim या वृत्तवाहिनीनुसार, इराणने अमेरिकेबरोबर कोणतीही अधिकृत चर्चा झाल्याचे मान्य करण्यास नकार दिला आहे. मात्र, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्लामाबादमार्फत पाठवलेल्या १५ कलमी योजनेला इराणने उत्तर दिले होते.

यादरम्यान अमेरिका आणि इस्रायलने सोमवारी इराणवर हल्ले करणे सुरूच ठेवले. दुसरीकडे, इराणने कुवेतमधील एका महत्त्वाच्या पाणी आणि वीज प्रकल्पावर हल्ला केला, तसेच उत्तर इस्रायलमधील एका तेल शुद्धीकरण प्रकल्पाला देखील लक्ष्य केले.