शापूरजी पालनजी उद्योग समुहाचे प्रमुख पालनजी मिस्त्री यांचे निधन

शापूरजी पालनजी उद्योग समुहाचे प्रमुख पालनजी मिस्त्री यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी निधन झाले.

Pallonji Mistry
Pallonji Mistry (फोटो- ट्विटर)

शापूरजी पालनजी उद्योग समुहाचे प्रमुख पालनजी मिस्त्री यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी दक्षिण मुंबईतील त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. तशी माहिती उद्योगस समूहाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

पालनजी मिस्त्री हे शापुरजी पालनजी ग्रुपचे प्रमुख तसेच टाटा ग्रुपमधील सर्वात मोठे वैयक्तिक भागदारक होते.शापूरजी पालनजी ग्रुपची स्थापना १८६५ साली करण्यात आली होती. हा उद्योग समूह अभियांत्रिकी, बांधकाम, पायाभूत सुविधा, रिअल इस्टेट, पाणी, उर्जा, आर्थिक सेवा तसेच इतर क्षेत्रात काम करते. पालनजी मिस्त्री त्यांच्या परिवारासोबत हा उद्योग समूह चालवायचे.

मोदी यांनी व्यक्त केले दु:ख

पालनजी यांच्या मृत्यूनंतर देशभरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील पालनजी यांच्या निधनानंतर दु:ख व्यक्त केले आहे. पालनजी यांनी वाणिज्य आणि उद्योग क्षेत्रात आपले अतुलनीय योगदा दिले. त्यांचा परिवार, मित्रांप्रती मी संवेदना व्यक्त करतो, असा शोकसंदेश मोदी यांनी दिला.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pallonji mistry chairman of shapoorji pallonji group passes away in mumbai prd

Next Story
“पूरग्रस्त गुवाहाटीत लोकांना अन्न मिळत नसताना बंडखोर आमदारांचा दिवसाचा जेवणाचा खर्च…”; आदित्य ठाकरेंनी सांगितला बिलाचा आकडा
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी