पंजशीरवर तालिबानचा ताबा? अमरुल्ला सालेह यांनी दिली महत्त्वाची माहिती

तालिबानला पंजशीरमधून आव्हान देणाऱ्या अमरुल्ला सालेह स्वतः पंजशीरमधल्या परिस्थितीची माहिती दिली आहे.

Panjshir not fled anywhere Afghanistan amrullah saleh taliban rumours
स्वतःला अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष घोषित करणारे अमरुल्ला सालेहसुद्धा पंजशीरमधून पळून गेल्याचे वृत्त समोर आलं आहे.

अफगाणिस्तानातील नवीन सरकारची स्थापना तालिबानने शुक्रवारी लांबणीवर टाकली. आता ही स्थापना शनिवारी  जाहीर करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे. तालिबानचा प्रवक्ता झबीउल्ला मुजाहिद याने सांगितले, की सरकार स्थापना आता शनिवारी करण्यात येणार आहे. दरम्यान २० वर्षांनंतर अफगाणिस्तानमध्ये सत्तेत परतलेल्या तालिबानने शुक्रवारी पंजशीरवर ताबा मिळवल्याचा दावा केला आहे. माध्यमांच्या वृत्तांमध्ये पंजशीर देखील तालिबानच्या ताब्यात गेले आहे दावा केला जात आहे. त्यानंतर स्वतःला अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष घोषित करणारे अमरुल्ला सालेहसुद्धा पंजशीरमधून पळून गेल्याचे वृत्त समोर आलं आहे. याबाबत अफगाणिस्तानचे उपराष्ट्रपती आणि तालिबानला पंजशीरमधून आव्हान देणाऱ्या अमरुल्ला सालेह स्वतः पंजशीरमधल्या परिस्थितीची माहिती दिली आहे.

अमरुल्ला सालेह यांनी देश सोडून पलायन केले नसल्याचे सांगितले आहे. सालेह पंजशीर खोऱ्यात असून आणि नॉर्दन अलायन्स दलाचे कमांडर आणि राजकीय व्यक्तींसोबत असल्याचे सालेह यांनी म्हटले आहे. अमरुल्ला सालेह यांनी शुक्रवारी सर्व प्रसारमाध्यमांचे वृत्त फेटाळून लावले आहेत.

इंडिया टुडेसोबत झालेल्या संभाषणात अमरुल्ला सालेह यांनी याची माहिती दिली आहे. “मी माझ्या देशातून पळून गेलो आहे असे काही माध्यमांमधून पसरवले जात आहेत. हे पूर्णपणे निराधार आहे. हा माझा आवाज आहे, मी तुम्हाला पंजशीर खोऱ्यातून, माझ्या तळावरून फोन करत आहे. मी आमच्या कमांडर आणि राजकीय नेत्यांसोबत आहे आणि परिस्थितीचे व्यवस्थापन करत आहे. ही एक कठीण परिस्थिती आहे, आम्ही तालिबान आणि पाकिस्तानी आणि अल कायदा आणि इतर दहशतवादी संघटनांच्या आक्रमणाखाली आहोत, ” असे अमरुल्ला सालेह यांनी म्हटले आहे.

“गेल्या चार-पाच दिवसांपासून तालिबानने आपले आक्रमण सुरू केले आहे पण ते कोणताही महत्त्वपूर्ण भाग मिळवू शकले नाहीत. त्यांची मोठी जीवितहानी झाली आहे, आमचेही सैन्य जखमी झाले आहे,” असे अमरुल्ला सालेह म्हणाले.

गुरुवारी पंजशीरमध्ये तालिबानसोबत झालेल्या संघर्षांनतर अमरुल्ला सालेह ताजिकिस्तानला पळून गेले आहेत असा दावा काही माध्यमांनी केला आहे. त्याआधी अमरुल्ला सालेहने दावा केला होता की तालिबानने उत्तर प्रांतात प्रवेश रोखला आहे आणि या प्रदेशातील फोन लाईन आणि वीज पुरवठा देखील खंडित केला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Panjshir not fled anywhere afghanistan amrullah saleh taliban rumours abn

ताज्या बातम्या