Pappu Yadav Controversial Remark Politicians Porn: महिला राजकीय नेत्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याने वादात सापडलेल्या अपक्ष खासदार पप्पू यादव यांनी आणखी एक खळबळजनक दावा केला आहे. पप्पू यादव यांनी पुरुष राजकीय नेत्याच्या खोलीत वेळ घालवल्याशिवाय ९० टक्के महिला राजकीय क्षेत्रात येऊच शकत नाहीत, असे विधान करुन वाद ओढवून घेतला आहे. त्यानंतर त्यांनी आता आणखी एक खळबळजनक दावा केला आहे.

८० टक्के राजकीय नेते पॉर्न पाहतात – पप्पू यादव

महिला राजकीय नेत्यांबाबत वादग्रस्त व्यक्तव्य करुन वादात सापडलेल्या खासदार पप्पू यादव यांना बिहार महिला राज्य आयोगाने नोटीस बजावली आहे. हा वादा ताजा असतानाच त्यांनी आता “७० ते ८० टक्के राजकीय नेते पॉर्न पाहतात”, असे खळबळजनक दावा केला आहे. मंगळवारी महिला आरक्षण दुरुस्ती विधेयकावर बोलताना पप्पू यादव चांगलेच संतापले होते. त्यांनी संताप व्यक्त करताना घरगुती हिंसाचाराचा उल्लेख केला. अमेरिका आणि भारतात याचे प्रमाण अधिक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

नक्की काय म्हणाले पप्पू यादव?

राज्य महिला आयोगाने बजावलेल्या नोटीसीला उत्तर देताना पप्पू यादव म्हणाले की, “मी संसदेत देखील याचा उल्लेख केला होता. ७० ते ८० टक्के राजकीय नेते पॉर्न पाहतात. तेव्हा प्रत्येकाचे फोन तपासा, माझ्या फोनमध्येही पॉर्न आहे की नाही हे तपासा. ज्यांनी मला नोटीस पाठवली आहे ते लोक कोण आहेत? ते कोणासोबत आहेत? माजी मंत्र्यांचे अनेक फोटो आहेत. काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगडफेक करु नये.”

महिलांसाठीच लढा देत असल्याचा दावा

“महिलांना त्रास दिल्याशिवाय त्यांचा छळ केल्याशिवाय पुरुष त्यांना राजकारणात प्रवेश करुन देत नाहीत”, असे पप्पू यादव म्हणाले. “मी महिलांसाठीच लढा देतोय. ७५५ पुरुष राजकीय नेत्यांविरोधात शारीरिक छळाचे गुन्हे दाखल आहेत, १५५ नेत्यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. देशाला डाग लागला आहे, मी पुरुष राजकीय नेत्यांबाबत बोलत असेन तर महिला आयोगाला काय समस्या आहे? महिलांचा छळ करतात आणि नंतर महिला आरक्षण विधेयकावर बाता मारतात”, असे पप्पू यादव म्हणाले.

यापूर्वीचे वादग्रस्त विधान

“घरगुती हिंसाचार कोण करतंय? महिलांवर वाईट नजर कोण ठेवतंय? अमेरिका ते भारत, यात सर्व राजकीय नेते आहेत. पुरुष राजकीय नेत्याच्या खोलीत वेळ घालवल्याशिवाय ९० टक्के महिला राजकीय क्षेत्रात येऊच शकत नाहीत. हे दररोज घडतंय. राजकीय नेत्यांचे आक्षेपार्ह व्हिडीओ रोज समोर येत आहेत. महिलांचा छळ करणे त्यांना त्रास देणे आजकाळ संस्कृती होऊ लागली आहे”, असे पप्पू यादव म्हणाले.