प्रियकराला भेटली म्हणून आई वडिलांनीच केली १५ वर्षांच्या मुलीची हत्या

हा गुन्हा लपवण्यासाठी त्यांनी मृतदेह शेतात पुरला

उत्तर प्रदेशमधील आग्रा येथे एका दांपत्याला त्यांच्या मुलीचा खून केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. या दांपत्याने उत्तर प्रदेशमधील फिरोजाबाद जिल्ह्यामध्ये आपल्या मुलीचा खून करुन तिचा मृतदेह पुरुन टाकण्याची माहिती समोर आली आहे.

अटक करण्यात आलेल्या पती पत्नीने त्यांच्या १५ वर्षाची मुलगी प्रभा हिचा खून केला. मागील सोमवारी प्रभा तिच्या घराच्या बाजूलाच राहणाऱ्या तिच्या प्रियकराला भेटायला गेली होती. त्यामुळे प्रभा आणि तिच्या पालकांमध्ये जोरदार भांडण झाले. त्यानंतर या दोघांनाही रात्री प्रभाची गळा चिरुन हत्या केली. हत्येचा पुरावा लपवण्यासाठी या दोघांनी प्रभाचा मृतदेह शेतामध्ये नेऊन पुरला.

ही घटना घडली त्या मोहम्मदाबादमधील गावकऱ्यांनी मंगळवारी या घटनेची माहिती स्थानिक पोलीस स्थानकामध्ये दिली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणामध्ये महिलेला ताब्यात घेतले. या महिलेचा पती शेतामधील गवतामध्ये लपून बसला होता. पोलिसांनी शोध घेतल्यानंतर दोघांना ताब्यात घेत पोलीस स्थानकात आणण्यात आले. तेथे पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली.

स्थानिक पोलीस अधिकारी असणाऱ्या ज्ञानेंद्र कुमार यांनी यासंदर्भात माहिती देताना, “या दोघांनाही आपल्या मुलीची हत्या करुन तिचा मृतदेह शेतामध्ये पुरला. मात्र आमच्या फॉरेन्सिक टीमला या मुलीच्या शरीराच्या काही अवयवांचे भाग सापडले आहेत. खूपच निर्घृणपणे या मुलीची हत्या करण्यात आल्याचे प्रथमिक माहितीमधून दिसत आहे,” असं सांगितलं. कलम ३०२ (खून) आणि कलम २०१ (पुरवा नष्ट करण्याच प्रयत्न) अंतर्गत दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Parents turn murderers angry at daughter for meeting boyfriend couple smothers her to death scsg

Next Story
शांत व आरोग्यदायी झोपेसाठी सेंद्रिय बिछाना
ताज्या बातम्या