Parliament Monsoon Session All Party Meeting ; संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी सरकारने आज, रविवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. मात्र, या बैठकीतून सर्व विरोधकांनी सभात्याग केला. नॅशनलिस्ट सिटीझन्स पार्टी ऑफ इंडिया अर्थात NCPI मध्ये विलीन झालेल्या तृणमूल काँग्रेसच्या बंडखोर गटालाही या बैठकीत आमंत्रण दिल्याने विरोधकांनी तीव्र आक्षेप घेतला.

काँग्रेस खासदार आणि माध्यम प्रभारी जयराम रमेश यांनी ‘द इंडियन एक्सप्रेस’ला सांगितलं की, द्रमुक आणि आम आदमी पार्टी या पक्षांनी अलीकडेच ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकांना दांडी मारली होती, परंतु आज इतर विरोधी पक्षांसह त्यांनीही या सर्वपक्षीय बैठकीतून सभात्याग केला. रमेश जयराम म्हणाले, “सर्व विरोधी पक्षांनी काही मिनिटांसाठी सर्वपक्षीय बैठकीतून सभात्याग करून निषेध नोंदवला. तृणमूल काँग्रेसच्या २० बंडखोर खासदारांचे पार्किंग प्लेस बनलेल्या NCPI ला आमंत्रित करण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयाविरोधात हा निषेध होता, कारण या विलीनीकरणाबाबतचा अंतिम निर्णय अद्याप अध्यक्षांकडे (स्पीकर) प्रलंबित आहे.”

NCPI मान्यता नसलेला पक्ष

बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना तृणमूल काँग्रेसचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकसभा सदस्य महुआ मोईत्रा म्हणाल्या, “आज काँग्रेस, समाजवादी पक्ष, द्रमुक, जेएमएम, आम आदमी पार्टी, नॅशनल कॉन्फरन्स, डावे पक्ष, आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) या सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येत सर्वपक्षीय बैठकीतून वॉकआऊट केलं. 1आहे आणि तरीही त्यांना आमंत्रित केल्यामुळे हा निषेध करण्यात आला.”

बंडखोर खादसारांच्या २० याचिका प्रलंबित

त्या पुढे म्हणाल्या, “लोकसभा टेबल ऑफिसने दिलेल्या यादीत ऑल इंडिया तृणमूल काँग्रेसचे संख्याबळ २८ दाखवले आहे. या २० बंडखोर खासदारांच्या विलीनीकरणाला अध्यक्षांनी मंजुरी दिलेली नाही आणि त्यांच्या विरोधातील अपात्रतेच्या २० याचिका अजूनही प्रलंबित आहेत. ९१ व्या घटनादुरुस्तीनंतर स्वतंत्र गट स्थापन करण्यास वाव उरलेला नाही. मग कोणत्या आधारावर संसदीय कार्यमंत्र्यांनी या २० बंडखोर खासदारांना आमंत्रण दिलं आणि ते या बैठकीला कसे उपस्थित राहिले? आम्ही आमचा तीव्र निषेध नोंदवून सभात्याग केला आणि आम्हाला पाठिंबा दिल्याबद्दल सर्व विरोधी पक्षांचे आभार मानतो.”

समाजवादी पक्षाचे खासदार धर्मेंद्र यादव म्हणाले, “संपूर्ण विरोधी पक्ष एकत्र आहे. सरकारने कितीही पक्षबदल घडवून आणण्याचा किंवा फूट पाडण्याचा प्रयत्न केला, तरी ते विरोधकांमध्ये मतभेद निर्माण करू शकलेले नाहीत.” सीपीआय(एम) चे राज्यसभा सदस्य जॉन ब्रिटास यांनी पक्षाचं प्रतिनिधित्व करताना सांगितलं की, विरोधी पक्षांनी सभात्याग केला कारण तृणमूल काँग्रेसमधील फूट अद्याप अध्यक्षांनी स्वीकारलेली नाही किंवा त्यावर कोणताही निर्णय दिलेला नाही. त्यामुळे या सर्वपक्षीय बैठकीचे पावित्र्य भंग पावले आहे.”

ते पुढे म्हणाले, “सरकारने ज्या घाईघाईने आणि मनमानी पद्धतीने बंडखोर गटाला आमंत्रित केलं आहे, ते सर्वपक्षीय बैठकीच्या पावित्र्याला आणि विश्वासार्हतेला तडा देणारं आहे.” जून महिन्यात तृणमूल काँग्रेसच्या एका खासदारांच्या गटाने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना सांगितलं होतं की त्यांनी NCPI मध्ये स्वतःला विलीन केले असून त्यांना सभागृहात स्वतंत्र गट म्हणून बसण्याची परवानगी हवी आहे. या विलीनीकरणावरील अंतिम निर्णय सध्या अध्यक्षांकडे प्रलंबित आहे.