वृत्तसंस्था, नवी दिल्ली : निती आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी (सीईओ) निवृत्त सनदी अधिकारी परमेश्वरन अय्यर यांची नियुक्ती करण्याचा निर्णय सरकारने शुक्रवारी घेतला. अय्यर हे भारतीय प्रशासकीय सेवेच्या (आयएएस) १९८१ च्या तुकडीचे उत्तर प्रदेश केडरचे निवृत्त अधिकारी असून ते अमिताभ कांत यांची जागा घेतील. ते निती आयोगाचे तिसरे सीईओ असतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारत सरकारची सार्वजनिक धोरणे ठरविण्याचे काम निती आयोग करतो. निती आयोगाचे विद्यमान सीईओ कांत यांचा कार्यकाळ ३० जून २०२२ रोजी संपुष्टात येत आहे. त्यानंतर या पदावर अय्यर हे काम करतील, असे सरकारच्या अधिसूचनेत म्हटले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने अय्यर यांच्या नियुक्तीला दोन वर्षे किंवा पुढील आदेश मिळेपर्यंतच्या कालावधीपर्यंत (यापैकी जो आधी असेल त्याप्रमाणे) मंजुरी दिली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Parmeshwaran iyer ceo policy commission appointment decision government ysh
First published on: 25-06-2022 at 00:02 IST