दुबई-जयपूर फ्लाईट हायजॅक (विमानाचे अपहरण) झाल्याचं खोटं ट्विट करण्याच्या आरोपाखाली दिल्ली पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार राजस्थानच्या नागौर येथील रहिवासी असलेल्या मोती सिंह राठोड यांना अटक करण्यात आली आहे. राठोड ज्या विमानात बसले होते ते विमान दुबईहून जयपूरला जात होतं. परंतु खराब हवामानामुळे हे विमान दिल्ली विमानतळावर उतरवण्यात आलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिल्ली विमानतळावर उतरवण्यात आलेलं विमान वेगवेगळ्या क्लीअरन्सनंतर उड्डाण करणार होतं, तेव्हा एका प्रवाशाने फोटोसह ट्विट केलं, ज्यामध्ये लिहिलं, ‘फ्लाईट हायजॅक…!’ मोती सिंह यांच्या या ट्विटनंतर विमानतळ प्रशासनाने त्वरित हालचाली सुरू केल्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोती सिंह हे विमानाने उड्डाण न केल्यामुळे संतप्त झाले होते.

खराब हवामानामुळे दिल्ली विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग

ही घटना २५ जानेवारीची आहे. यावेळी उत्तर भारतातलं हवामान खराब झालं होतं. सकाळी ९.४५ वाजता स्पाईसजेटचं विमान एसजी ५८ दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरवण्यात आलं होतं. खराब हवामानामुळे या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं होतं. परिस्थिती सुधारल्यानंतर दुपारी १.४० वाजता दिल्ली एटीसीने विमानाच्या उड़्डाणाला परवानगी दिली. याचदरम्यान, मोती सिंह यांनी विमानाचं अपहरण झाल्याचं ट्विट केलं.

हे ही वाचा >> Republic Day: पहिल्यांदाच नऊ राफेल विमानांची प्रात्यक्षिकं, जाणून घ्या आणखी खास काय काय घडलं?

आरोपीविरोधात गुन्हा दाखल

सहाय्यक पोलीस उपायुक्तांनी (दिल्ली विमानतळ) सांगितलं की, ट्विटची माहिती मिळताच विमानतळ प्रशासनाने तपास सुरू केला. हे विमान दिल्ली पोलिसांसह वेगवेगळ्या एजन्सींनी तपासलं. त्यानंतर विमानाने उड्डाण केलं. पोलिसांनी सांगितलं की, आरोपी प्रवाशाला त्याच्या लगेजसह (सामान) उतरवण्यात आलं. याप्रकरणी आरोपीविरोधात वेगवेगळ्या कलमांखाली गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Passenger deboarded from spicejet dubai jaipur flight over hijack tweet arrested by delhi police asc
First published on: 27-01-2023 at 12:33 IST