पंतप्रधान मोदींच्या रॅलीतील स्फोटातील चार दोषींना फाशी; दोघांना जन्मठेपेची शिक्षा

गांधी मैदान आणि पाटणा जंक्शन येथे झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला होता तर ८९ जण जखमी झाले होते.

Patna Gandhi Maidan serial blasts NIA Court narendra modi hunkar rally patna
नरेंद्र मोदी यांच्या ‘हुंकार’ रॅलीदरम्यान गांधी मैदानात बॉम्बस्फोट झाले होते.

पाटण्यातील गांधी मैदान बॉम्बस्फोट प्रकरणात दोषी आढळलेल्या नऊ आरोपींना एनआयए न्यायालयाने सोमवारी शिक्षा सुनावली. एनआयए कोर्टाने इम्तियाज अन्सारी, हैदर अली उर्फ ​​ब्लॅक ब्युटी, नोमान अन्सारी, मुजिबुल्ला अन्सारी यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. दुसरीकडे, दोन दोषींना ओमर सिद्दीकी, अझरुद्दीन यांना जन्मठेपेची आणि अहमद हुसैन, फिरोज अस्लमला १० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. याशिवाय एका इफ्तेखार आलमला सात वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

२७ ऑक्टोबर २०१३ रोजी गांधी मैदान आणि पाटणा जंक्शन येथे साखळी बॉम्बस्फोट झाले होते. या घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला होता तर ८९ जण जखमी झाले होते. तब्बल आठ वर्षांनंतर या खटल्याचा निकाल लागला आहे. बुधवारी न्यायालयाने मुख्य सहा आरोपींना देशद्रोह, गुन्हेगारी कट, खून, हत्येचा प्रयत्न, UAPA कायद्याच्या कलमांतर्गत दोषी ठरवले होते. इतर तिघे दोषी आढळले. तर एकाची पुराव्याअभावी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.

नरेंद्र मोदींच्या हुंकार रॅलीत रांची आणि रायपूरमध्ये गांधी मैदानात बॉम्बस्फोटाचा कट रचण्यात आला होता. सात जुलै २०१३ रोजी बोधगया बॉम्बस्फोटानंतरच पाटण्यातील गांधी मैदानावरील स्फोटाची योजना इंडियन मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्यांनी आखली होती. बोधगया बॉम्बस्फोटाचे सूत्रधार हैदर अली आणि मोजिबुल्ला हे होते. बोधगया बॉम्बस्फोटात हैदरने बौद्ध भिक्खू म्हणून बॉम्ब पेरले होते. यानंतर गांधी मैदानावर मोदींच्या सभेत स्फोट घडवण्यासाठी दहशतवाद्यांनी स्फोटके गोळा करून रांचीमध्ये एकत्र केली.

बॉम्बस्फोट घडवून आणण्यासाठी आठ दहशतवादी सकाळीच बसने रांचीहून पाटण्याला पोहोचले होते. त्यांनी त्यांच्या योजनेनुसार स्वतंत्रपणे काम सुरू केले. दरम्यान, पाटणा जंक्शनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक दहाच्या टॉयलेटमध्ये मानवी बॉम्ब बनवताना स्फोट झाला. यामध्ये एक दहशतवादी मारला गेला. पाटणा जंक्शन येथे ब्लास्टिंग करताना पकडला मोहम्मद. इम्तियाजच्या चौकशीत रांचीशी संबंधित माहिती सापडली.

यानंतर एनआयएने रांचीमधील हिंदपिरी आणि सिथियो येथे छापे टाकले. याशिवाय आरोपींनी रायपूरमध्ये प्रशिक्षणही घेतले होते. उमर सिद्दीकी आणि अझरुद्दीन यांना रायपूरमधूनच अटक करण्यात आली होती. यातूनच नरेंद्र मोदींना टार्गेट करून स्फोट घडवण्याची योजना आखण्यात आली होती. रांचीमध्ये त्याची अंमलबजावणी करण्यासाठी एक कृती योजना तयार करण्यात आली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Patna gandhi maidan serial blasts nia court narendra modi hunkar rally patna abn

Next Story
पेट्रोल, डिझेल, एलपीजी दरात पुढील आठवडय़ात वाढ?
ताज्या बातम्या