scorecardresearch

Premium

सावकाराकडून दलित महिलेची विवस्त्रावस्थेत धिंड

खुस्रुपूर भागात या महिलेवरील हल्ल्यात गुंतलेल्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री नितीशकुमार म्हणाले. ‘अशा प्रकारची घटना प्राधान्याने हाताळण्याची सूचना मी पोलीस व प्रशासनाला दिली आहे’, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले.

woman
(संग्रहित छायाचित्र)

पीटीआय, पाटणा : सावकाराचे संपूर्ण कर्ज फेडल्यानंतरही त्याच्या ‘अन्यायकारक’ मागणीबद्दल पोलिसांकडे तक्रार केल्याबद्दल एका दलित महिलेला कथितरीत्या नग्न करण्यात येऊन व तिच्यावर हल्ला करून तिच्या तोंडावर लघुशंका करण्यात आल्याची घृणास्पद घटना बिहारच्या पाटणा जिल्ह्यात घडली.

 खुस्रुपूर भागात या महिलेवरील हल्ल्यात गुंतलेल्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री नितीशकुमार म्हणाले. ‘अशा प्रकारची घटना प्राधान्याने हाताळण्याची सूचना मी पोलीस व प्रशासनाला दिली आहे’, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले.  पाटण्याच्या खुस्रुपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका खेडय़ात २३ सप्टेंबरच्या रात्री घडलेल्या या घटनेतील प्रमुख आरोपी प्रमोद सिंह व त्याचा मुलगा अंशू सिंह हे फरार असून, त्यांच्या अटकेसाठी शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली.

Two accused who raped minor girl
चिमुकलीवर बलात्कार करणाऱ्यांना कारागृहातून घेतले ताब्यात; दोघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी
pune bibvewadi goon, amravati jail, pune goon sent to amravati jail, pune police commissioner, mpda act
बिबवेवाडीतील गुंडाविरुद्ध झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई; पोलीस आयुक्तांच्या आदेशाने अमरावती कारागृहात रवानगी
Supriya Sule
“पत्रकारांना चहा प्यायला न्या”, बावनकुळेंच्या विधानावर सुप्रिया सुळेंची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाल्या, “भाजपाने एकतर…”
thackeray group express doubt on disqualification petitions hearing
विधानपरिषदेतील सेना आमदारांविरोधातील याचिका सुनावणीत संदिग्धता; ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याचा इशारा

तर घेतलेले कर्ज व्याजासह फेडल्यानंतरही आपल्याला हा छळ सहन करावा लागला, असे या घटनेतील जखमी पीडितेने सांगितले. ‘माझ्या पतीने काही महिन्यांपूर्वी प्रमोद सिंह याच्याकडून १५०० रुपये उधार घेतले होते आणि ही रक्कम व्याजासह परत केली होती. मात्र तो आणखी पैशांची मागणी करत होता. आम्ही त्याची मागणी नाकारली’, असे ही महिला म्हणाली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Paying off the loan dalit woman naked by moneylender ysh

First published on: 26-09-2023 at 00:38 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×