पीटीआय, पाटणा : सावकाराचे संपूर्ण कर्ज फेडल्यानंतरही त्याच्या ‘अन्यायकारक’ मागणीबद्दल पोलिसांकडे तक्रार केल्याबद्दल एका दलित महिलेला कथितरीत्या नग्न करण्यात येऊन व तिच्यावर हल्ला करून तिच्या तोंडावर लघुशंका करण्यात आल्याची घृणास्पद घटना बिहारच्या पाटणा जिल्ह्यात घडली.
खुस्रुपूर भागात या महिलेवरील हल्ल्यात गुंतलेल्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री नितीशकुमार म्हणाले. ‘अशा प्रकारची घटना प्राधान्याने हाताळण्याची सूचना मी पोलीस व प्रशासनाला दिली आहे’, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले. पाटण्याच्या खुस्रुपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका खेडय़ात २३ सप्टेंबरच्या रात्री घडलेल्या या घटनेतील प्रमुख आरोपी प्रमोद सिंह व त्याचा मुलगा अंशू सिंह हे फरार असून, त्यांच्या अटकेसाठी शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली.
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Paying off the loan dalit woman naked by moneylender ysh