देशात ‘डिजिटल भारत’ ही संकल्पना सुरु झाल्यापासून अनेक गोष्टींमध्ये बदल झाला आहे. यातील सर्वात मोठा बदल पैशांच्या देवाण-घेवाणीवर झाला आहे. छोट्या छोट्या गोष्टींसाठी लोक ‘क्यूआर कोड’च्या माध्यमातून पैसे पाठवतात. मग तो भाजीवाला असो वा कपड्यांची इस्त्री करणारा. पण, आता ‘पेटीएम’च्या माध्यमाने पैसे घेणे न्यायालयातील शिपायाला चांगलेच महागात पडलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोशल माध्यमांत एक फोटो व्हायरल होत होता. त्यामध्ये अलाहाबाद न्यायालयातील एक शिपाई वकिलांपासून पैसे घेण्यासाठी आपल्या कमरेला ‘पेटीएम’चे ‘क्यूआर कोड’ लावून फिरत असे. पण, यानंतर आता अलाहाबाद न्यायालयाने या शिपायाला निलंबित केलं आहे. न्यायाधीश राजेश बिंदल यांनी ही कारवाई केली आहे.

PM Narendra Modi
पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर गंभीर आरोप; म्हणाले, “इंदिरा गांधींची संपत्ती मिळवण्यासाठी…”
Vladimir putin and joe biden
जगात पुन्हा अमेरिका वि. रशिया? युक्रेनच्या मदतीला यूएसचा शस्त्रसाठा; चीन-इराण रशियाला मदत करत असल्याचा दावा!
Ashok gehlot
राजस्थानात फोन टॅपिंगप्रकरणी मोठे गौप्यस्फोट, माजी मुख्यमंत्री अशोक गहलोतांवर गंभीर आरोप!
we can not interference against evms based on suspicion clarification by supreme court
निव्वळ संशयावरून हस्तक्षेपाची गरज नाही! ईव्हीएमबाबत सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण

हेही वाचा : “मी तो पक्षी आहे, ज्याचे घरटे…”, NDTV चा राजीनामा दिल्यानंतर रवीश कुमार भावूक

काय आहे संपूर्ण प्रकरण?

अलाहाबाद न्यायालयात एक शिपाई वकिलांपासून ‘पेटीएअम’च्या माध्यमाने पैसे घ्यायचा. यासाठी शिपायाने आपल्या कमरेला ‘पेटीएम’चा ‘क्यूआर कोड’ लावला होता. तोच फोटो कोणतरी काढून व्हायरल केला. त्यानंतर आता या शिपायावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.