मेहबूबा मुफ्ती घरात नजरकैदेत; मुख्य दाराला कुलूप लावल्याचा पीडीपी नेत्याचा दावा

मेहबूबा या दक्षिण काश्मीर भागातल्या अनंतनाग जिल्ह्यात मृत्यूमुखी पडलेल्या या तरुणाच्या परिवाराला भेटायला जाणार होत्या.

पीपल्स डेमोक्रेटिक पक्षाच्या नेत्याने दावा केला आहे की, पक्षाच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांना त्यांच्याच घरात नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे. अनंतनागमध्ये गेल्या आठवड्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत मृत्यूमुखी पडलेल्या एका तरुणाच्या परिवाराला भेटायला जाऊ नये यासाठी त्यांना कैद केलं असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या नेत्याच्या मते, पोलिसांनी मेहबूबा मुफ्ती यांच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप लावण्यात आलं आहे.

तर एका पोलीस अधिकाऱ्याच्या मते, सुरक्षेच्या कारणासाठी मुफ्ती यांना अनंतनाग इथं जाण्यापासून रोखण्यात आलं आहे.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, २४ ऑक्टोबरला शोपियान जिल्ह्यातले केंद्रीय राखीव सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांच्या एका गटात चकमक झाली. या चकमकीदरम्यान शाहिद अहमद या तरुणाचा मृत्यू झाला होता. पीडीपी नेत्याने दावा केला आहे की, मेहबूबा यांना त्यांच्या घरात नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे. मेहबूबा या दक्षिण काश्मीर भागातल्या अनंतनाग जिल्ह्यात मृत्यूमुखी पडलेल्या या तरुणाच्या परिवाराला भेटायला जाणार होत्या. मात्र, त्यांना आपल्या घराबाहेर पडू दिलं जात नाही. नवभारत टाइम्सने याविषयी सविस्तर वृत्त दिलं आहे.

या नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी मेहबुबा मुफ्ती यांच्या घराच्या मुख्य दरवाज्याला कुलूप लावण्यात आलं आहे. घरात कोणालाही यायला किंवा घरातून बाहेर पडायला परवानगी नाही. घराबाहेर पोलिसांचा एक गटही तैनात करण्यात आला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Pdp leader claimed mehbooba mufti is under house arrest vsk

Next Story
बराक ओबामा यांची रोम्नींवर टीका
ताज्या बातम्या