पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ते १८ वयोगटातील किशोरवयीन मुलांच्या लसीकरणाची घोषणा शनिवारी केली. तसेच आरोग्य सेवेतील आणि आघाडीवरील कर्मचाऱ्यांबरोबरच ६० वर्षांवरील व्याधीग्रस्तांना बूस्टर डोस देण्याचेही मोदी यांनी जाहीर केले होते. तसेच आरोग्य सेवा आणि आघाडीवरील कर्मचाऱ्यांसह ६० वर्षांवरील व्याधीग्रस्तांना त्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार १० जानेवारीपासून बूस्टर डोस देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले होते. दरम्यान, आता ६० वर्षांवरील सर्वांना बूस्टर डोस देण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“बूस्टर डोससाठीची प्रक्रिया अगदी आधी सारखीच असेल. जर तुमचे वय ६० वर्षांपेक्षा जास्त आहे आणि तुम्ही लसीचे दोन्ही डोस घेतले असतील, दुसरा डोस आणि तुम्ही नोंदणी करत असलेल्या दिवसातील अंतर ९ महिन्यांपेक्षा (३९ आठवडे) जास्त असेल तर तुम्ही बूस्टर डोससाठी पात्र आहात,” अशी माहिती कोविनचे प्रमुख डॉ. आर एस शर्मा यांनी दिली.

(हे ही वाचा: Booster Dose: ६० वर्षावरील नागरिकांना मिळणार बूस्टर डोस; लसीकरणासाठी ‘अशी’ करा नोंदणी; जाणून घ्या प्रक्रिया)

“जेव्हा तुम्ही नोंदणी कराल, तेव्हा तुम्हाला काही व्याधी आहेत की नाही हे विचारले जाईल. तुम्ही होय म्हटल्यास तुमची नोंदणी होऊन जाईल आणि लसीकरण केंद्रावर तुम्हाला नोंदणीकृत डॉक्टरांकडून व्याधीचे प्रमाणपत्र दाखवावे लागेल आणि त्यानंतर तुम्हाला बूस्टर डोस मिळेल,” असं डॉ. आर एस शर्मा म्हणाले.

लहान मुलांना १ जानेवारीपासून कोविनवर नोंदणी करता येणार..

१५ ते १८ वर्ष वयोगटातील मुलांचं लसीकरण सुरू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय. यासंदर्भात पंतप्रधान मोदी यांनी शनिवारी माहिती दिली होती. याबाबतील आणखी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. या वयोगटातील मुलांना १ जानेवारीपासून लसीकरणासाठी कोविनवर नोंदणी करता येणार आहे, अशी माहिती कोविनचे प्रमुख डॉ. आर एस शर्मा यांनी दिली आहे.

मोठी बातमी! १५ ते १८ वयोगटातील मुलांना १ जानेवारीपासून लसीकरणासाठी कोविनवर नोंदणी करता येणार

१५ ते १८ वर्षे वयोगटातील मुले १ जानेवारीपासून CoWIN अॅपवर लसीसाठी नोंदणी करू शकतील. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, सरकारने सोमवारी सकाळी सांगितले की मुले नोंदणी करण्यासाठी त्यांचं शाळेचं ओळखपत्र वापरू शकतात. कोविनचे प्रमुख डॉ. आर एस शर्मा यांनी सांगितले की, कोविनवर नोंदणीसाठी विद्यार्थ्यांनी ओळखपत्र वापरण्याची वापरण्याची परवानगी दिली आहे. कारण काही मुलांकडे आधार कार्ड नसण्याची शक्यता आहे.

(हे ही वाचा: Children Covid Vaccination: १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी ‘अशी’ करा नोंदणी; जाणून घ्या प्रक्रिया)

पंतप्रधान मोदींनी शनिवारी केली होती घोषणा..

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ते १८ वयोगटातील किशोरवयीन मुलांच्या लसीकरणाची घोषणा शनिवारी केली. तसेच आरोग्य सेवेतील आणि आघाडीवरील कर्मचाऱ्यांबरोबरच ६० वर्षांवरील व्याधीग्रस्तांना वर्धक लसमात्रा (बूस्टर डोस) देण्याचेही मोदी यांनी जाहीर केले होते. येत्या जानेवारीपासून देशाच्या लसीकरण कार्यक्रमाचा विस्तार करून त्यात १५ ते १८ वयोगटातील मुलांचा समावेश करण्यात येईल. या किशोरवयीन मुलांच्या लसीकरणाचा प्रारंभ ३ जानेवारीपासून होईल, असे मोदी यांनी नमूद केले. तसेच आरोग्य सेवा आणि आघाडीवरील कर्मचाऱ्यांसह ६० वर्षांवरील व्याधीग्रस्तांना त्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार १० जानेवारीपासून वर्धक लसमात्रा देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: People above 60 age with complete vaccination can get booster dose hrc
First published on: 27-12-2021 at 14:10 IST