गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज मतदान करण्यात येत आहे. हा दिवस गुजरातमधील जांबूर या गावासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. ‘मिनी आफ्रिका’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गावातील लोक आज पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. त्यांच्यासाठी खास आदिवासी मतदान केंद्रची उभारणी करण्यात आली आहे. पारंपरिक वेशभूषेसह आदिवासी नृत्य करत ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे.

आफ्रिकन वंशाचा हा सिद्दी समाज जुनागढच्या नवाबाशी संबंधित आहे. या नवाबाने त्यांना आफ्रिकेतून भारतात आणलं होतं. “हे लोक पूर्व आफ्रिकेचे गुलाम, नाविक आणि सैनिकांचे वंशज आहेत. या लोकांना शतकानुशतके अरब मुस्लीम व्यापाऱ्यांनी भारतीय राजघराण्यासह पोर्तुगीजांसाठी पाठवले आहे”, असे गुजरात पर्यटन विभागाच्या एका लेखात नमुद आहे. ही लोकं आता गुजरातच्या गीर जिल्ह्यातील मधुपूर जांबूर गावात राहतात. या गावातील एकूण ३ हजार ४८१ मतदारांपैकी ९० टक्के मतदार सिद्दी समाजाचे आहेत.

miller mathew
“दहशतवाद्यांना घरात घुसून मारू”, मोदींच्या वक्तव्यावर अमेरिकेची प्रतिक्रिया; म्हणाले, “भारत-पाक वादात आम्हाला…”
Indian-American Congressman Shri Thanedar
“ही फक्त सुरुवात..”, अमेरिकेत हिंदूंवर हल्ले वाढल्यानंतर भारतीय वंशाच्या खासदाराने व्यक्त केली चिंता
Shahryar Khan
व्यक्तिवेध: शहरयार खान
career in singin
चौकट मोडताना : ‘छंद म्हणून हवा तेवढा जोपासा’

Gujarat Election: “मोदी गेले म्हणजे…”; रवींद्र जडेजानं शेअर केला बाळासाहेब ठाकरेंचा VIDEO

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्याचं मतदान येत्या ५ डिसेंबरला होणार आहे. तर ८ डिसेंबरला हिमाचल प्रदेशसह गुजरात या दोन्ही राज्यांच्या निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. गुजरातमध्ये आज होत असलेल्या मतदानात जवळपास २ कोटी नागरिक मतदानाचा हक्क बजावणार आहेत. १९ जिल्ह्यांमधील ८९ मतदारसंघासाठी सध्या गुजरातमध्ये मतदान सुरू आहे. या निवडणुकीत पहिल्या टप्प्यात ७८८ उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत.

Gujarat Election: २९० कोटी कॅश, ५०० कोटींहून अधिकचे अंमली पदार्थ जप्त; दारुबंदी असलेल्या राज्यात १५ कोटींची दारु ताब्यात

गुजरातमध्ये गेल्या २७ वर्षांपासून भाजपा सत्तेत आहे. यावेळी भाजपाला आम आदमी पक्षानेदेखील मोठं आव्हान निर्माण केलं आहे. मात्र, खरी लढत ही भाजपा आणि काँग्रेसमध्येच असल्याचं भाजपा नेते अमित शाह यांनी म्हटले आहे.