ओडिशातील बालासोर बहनागा बाजार स्टेशनजवळ कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालडीगीची टक्कर झाल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात २३३ प्रवाशांचा मृत्यू झाला असून ९०० जण जखमी आहेत. मृत प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढण्याचे कार्य सुरू असून, जखमींवर जवळच्या मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, ओडिशातील नागरिकांची माणुसकी यानिमित्ताने समोर आली आहे. कारण जखमींच्या उपचारांसाठी रक्तदान करण्याकरता ओडिशातील नागरिकांनी रांगा लावल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >> Odisha train accident : भीषण अपघातानंतर ओडिशामध्ये दुखवटा, मृतांच्या नातेवाईकांना १२ लाखांची मदत जाहीर

या भयंकर ट्रेन अपघातानंतर मृतांसह जखमींचीही संख्या वाढतेय. आतापर्यंत ९०० प्रवासी जखमी झाल्याचे वृत्त आहे. कटक मेडिकल कॉलेज हॉस्पिटल आणि इतर हॉस्पिटल्समध्ये जखमींना दाखल करण्यात आलं आहे. हा अपघात इतका भयानक होता की जखमी प्रवाशांचा मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला आहे. त्यामुळे त्यांचा जीव वाचवण्याकरता मोठ्या प्रमाणात रक्ताची गरज आहे. त्यामुळे रक्तदात्यांनी पुढे येत रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले होते. हे आवाहन होताच काल (२ जून) रात्रीपासूनच जिल्हा मुख्यालय रुग्णालय आणि भद्रक या ठिकाणी ओडिशातील नागरीक रक्त द्यायला आले. या भीषण अपघातात आतापर्यंत २३३ प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे समोर येत आहेत. परंतु, ही संख्या अधिक वाढू नये याकरता ओडिशा सरकार आणि रुग्णालय प्रयत्न करत आहेत.

अपघात कसा झाला?

ओडिशाचे मुख्य सचिव प्रदीप जेना यांनी सांगितलं की, “या घटनेत ३ रेल्वेंचा अपघात झाला आहे. पहिल्यांदा दुरंतो एक्स्प्रेस आणि मालगाडीचा अपघात झाला. त्यानंतर कोरोमंडल मागून येऊन धडकली आहे. कोरोमंडल एक्स्प्रेसचे ७ डब्बे रुळावरून खाली घसरले आहेत. त्यामुळे मृतांच्या आकडेवारीत वाढ होण्याची शक्यता आहे.”

हेही वाचा >> किंकाळ्या, आरोळ्या आणि मृत्यूचं तांडव! कोरोमंडल एक्स्प्रेस दुर्घटनेत २३३ जणांचा मृत्यू, ९०० हून अधिक लोक जखमी

ओडिशामध्ये जो अपघात झाला त्या अपघातातल्या मृतांच्या कुटुंबीयांना १२ लाखांची मदत जाहीर झाली आहे. पंतप्रधान कार्यालय आणि रेल्वे मंत्रालयाने ही घोषणा केली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: People queue up in balasore to donate blood after the horrific train accident in balasore yesterday sgk
First published on: 03-06-2023 at 08:36 IST