scorecardresearch

एका रात्रीत पेट्रोल ८२ रुपयांनी तर डिझेल १११ रुपयांनी महागलं; श्रीलंकेतील इंधनाचे नवे दर पाहून बसेल धक्का

देशाच्या शक्ती आणि ऊर्जा मंत्र्यांनी ट्विटरवरुन आज सकाळी अचानक यासंदर्भातील माहिती श्रीलंकेतील जनतेला दिली

sri lanka fuel
श्रीलंकेमधील आर्थिक संकट अधिक बिकट झालेय (फाइल फोटो सौजन्य रॉयटर्स)

Sri Lanka Hikes Fuel Prices: आर्थिक संकटामध्ये सापडलेल्या श्रीलंकेमधील इंधनाच्या दरांमध्ये अचानक मोठी वाढ झालीय. आज श्रीलंकेमधील पेट्रोलचे दर २४.३ टक्क्यांनी वाढलेत तर डिझेलच्या दरांमध्ये ३८.४ टक्क्यांनी वाढ झालीय. परदेशी गंगाजळी संपुष्टात आल्याने इंधन आयात करण्यासाठी श्रीलंकन सरकारकडे पैसे नसल्याने देशातील इंधनाच्या दरांमध्ये अभूतपूर्व वाढ झालीय.

१९ एप्रिलनंतर दुसऱ्यांदा इंधनाच्या दरांमध्ये अशाप्रकारे मोठी वाढ झाली आहे. श्रीलंकेत सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या ऑक्टेन ९२ पेट्रोलचे दर ४२० रुपये लीटर (Petrol Rs 420 per litre) म्हणजेच १.१७ अमेरिकन डॉलर्सला एक लीटर इतके आहेत. तर डिझेलचे दर ४०० रुपये लीटर (Diesel Rs 400per litre) म्हणजेच १.११ डॉलर प्रती लिटर इतके आहेत. श्रीलंकेमधील इंधनाच्या दरांचा हा ऐतिहासिक उच्चांक असून यामुळे सर्वसामान्यांचे हाल होतानाचं चित्र दिसत आहे.

ऑक्टेन ९२ पेट्रोलचे दर २४.३ टक्क्यांनी म्हणजेच लीटरमागे ८२ रुपयांनी वाढलेत. तर डिझेलच्या दरांमध्ये झालेल्या ३८.४ टक्के वाढीमुळे लीटरमागे डिझेल १११ रुपयांनी महाग झालंय. देशामध्ये इंधन पुरवठा करणाऱ्या सायक्लोन पेट्रोलियम कॉर्परेशनने यासंदर्भातील माहिती दिलीय.

देशाचे शक्ती आणि ऊर्जा मंत्री कांचना विजेस्कारा यांनी ट्विटरवरुन आज सकाळी यासंदर्भातील माहिती दिली. “इंधनाचे दर आज पहाटे तीन वाजल्यापासून बदलण्यात आले आहेत. केंद्रीय मंत्रीमंडळाने इंधनाच्या दरांबद्दल घेतलेल्या नव्या निर्णयांप्रमाणे आता दर निश्चित केले जाणार आहेत,” असं कांचना यांनी ट्विटमध्ये म्हटलंय. बदलण्यात आलेल्या इंधनदरांमध्ये आयात, अपलोडिंग, वितरण आणि सर्व करांचा समावेश असेल, असंही मंत्र्यांनी ट्विटवरुन सांगत नवीन दरांचा तक्ताच शेअर केलाय.

सध्या श्रीलंकेमध्ये इंधनाचा तुटवडा असून पेट्रोल पंपांबाहेर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र दिसत आहे. इंडियन ऑइलची श्रीलंकेतील सबसिडरी कंपनी असणाऱ्या लंका आयओसीनेही इंधानेच दर वाढवले आहेत. पीटीआयला एलआयओसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार सायक्लॉन पेट्रोलीयम कॉर्पेर्शनच्या दरांशी जुळाणाऱ्या स्तरावमध्ये इंधनाची दरवाढ केली जाणार आहे. “आम्ही आमच्या इंधनाच्या किंमती सीपीसीच्या स्तरामध्ये वाढवल्यात,” असं गुप्ता म्हणाले.

रिक्षाचालकांनीही आता प्रत्येक किलोमीटरसाठी किमान ९० रुपये आणि त्यापुढील प्रत्येक टप्प्यासाठी ८० रुपये आकारणार असल्याचं जाहीर केलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Petrol at rs 420 per litre diesel rs 400 sri lanka hikes fuel prices to all time high scsg