डॉलरच्या तुलनेत घसरणाऱ्या रुपयाचा फटका आणि आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या वाढलेल्या किमती या पाश्र्वभूमीवर शनिवारी पुन्हा एकदा पेट्रोल दरवाढीचा निर्णय भारतीय तेल कंपन्यांनी घेतला. पेट्रोलच्या दरात दोन रुपये वाढ करण्यात आली असून मध्यरात्रीपासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली.
देशातील चार प्रमुख महानगरांमधील पेट्रोलचे प्रतिलिटर दर पुढीलप्रमाणे : दिल्ली ६६.३९ रुपये (सध्याचा दर ६३.९९ रुपये), कोलकाता ७३.७९ रुपये (७१.२९ रुपये), मुंबई ७४.६० रुपये (७२.०८ रुपये) आणि चेन्नई ६९.३९ रुपये (६६.८५ रुपये). ही वाढ स्थानिक कर वगळून असल्याने प्रत्येक ठिकाणी पेट्रोलचे दर वेगवेगळे असतील. गेल्या ३१ मे रोजी पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर ७५ पैसे आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर ५० पेसे वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीवरील सरकारचे नियंत्रण उठविले आहे. डिझेलच्या दरात दरमहा ५० पैशांची वाढ करण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे.