संपूर्ण देश करोना संकटाचा सामना करत असाताना सामान्यांना महागाईचा देखील फटका बसत आहे. गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात सतत वाढ होताना दिसत आहे. एका महिन्यात इंधनाच्या दरात ही १२ वी वाढ आहे. पेट्रोल १७ पैशांनी तर डिझेल २९ पैशांनी महागलं आहे.  दिल्लीत रविवारी डिझेलची किंमत ८४ रुपये प्रतिलिटर इतकी नोंदवली गेली. तर मुंबईत पेट्रोलचा दर १०० रुपयांच्या जवळ पोहोचला आहे.

पेट्रोलचे दर गेल्या काही दिवसांपासून सतत वाढत आहेत. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत पेट्रोलचा दर प्रतिलिटर ९३.२१ रुपये इतका आहे. तर डिझेलची किंमत प्रतिलिटर ८४.०७ रुपये इतकी आहे. राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील काही भागात पेट्रोलच्या दराने शंभरी गाठली आहे. मुंबईतही पेट्रोलचे दर शंभरीच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचले आहे. मुंबईत पेट्रोलचा दर प्रतिलिटर ९९.४९ रुपये आणि डिझेल प्रतिलिटर ९१.३० रुपये इतकं आहे.

Exam from Home : ‘ओपन बुक पद्धती’ने बारावीची परीक्षा; छत्तीसगड सरकारचा निर्णय

देशात पेट्रोलची उच्चांकी किंमत राजस्थानच्या गंगानगर जिल्ह्यात नोंदवली गेली आहे. या जिल्ह्यात पेट्रोलसाठी प्रतिलिटर १०४.१८ रुपये, तर डिझेलसाठी ९६.९१ रुपये मोजावे लागत आहेत. व्हॅट आणि मालवाहतूक शुल्कानुसार वेगवेगळ्या राज्यात इंधनाचे दर वेगवेगळे असतात. राजस्थानमध्ये सर्वाधिक व्हॅट आकारला जातो. त्यानंतर मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातही सर्वाधिक व्हॅट आहे.

‘…उस पर प्रधान अहंकारी’; काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं पंतप्रधानांवर अप्रत्यक्षरित्या टीकास्त्र

आंतरराष्ट्रीय बाजारातील इंधनाच्या दरावर तेल कंपन्या १५ दिवसांनी दर ठरवत असतात. मागील काही दिवसात विधानसभा निवडणुकांमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कोणताही बदल झाला नव्हता. मात्र निवडणूक संपताच पेट्रोल आणि डिझेलच्या किमती भडकल्या आहेत. इंधनाचे दर वाढत असल्याने सामान्य नागरिकांना फटका बसत आहे.