scorecardresearch

Petrol-Diesel Price Today: १३७ दिवसांनंतर देशात इंधन दरवाढ; जाणून घ्या कितीने महागलं पेट्रोल आणि डिझेल

साडे चार महिन्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अखेर वाढ

Fuel Price Hike in India: देशात गेल्या अनेक महिन्यांपासून स्थिर असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अखेर वाढ झाली आहे. राष्ट्रीय स्तरावर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत ८० पैशांची वाढ करण्यात आली आहे. पेट्रोल ८४ तर डिझेल ८३ पैशांनी महागलं आहे. राजधानी दिल्लीमध्ये आज म्हणजेच २२ मार्च २०२२ ला पेट्रोलचा दर ९५ रुपये ४१ पैशांवरुन वाढत प्रतिलीटर ९६ रुपये २१ पैसे झाला आहे. तर डिझेलचा दर ८६ रुपये ६७ पैशांवरुन ८७ रुपये ४७ पैशांवर पोहोचला आहे.

डिझेल २५ रुपयांनी महागल्यानंतर राष्ट्रवादीचं थेट मोदींना पत्र; म्हणाले “तुमच्या सरकारने…”

राष्ट्रीय स्तरावर पेट्रोल आणि डिझेलचे दर अशावेळी वाढवण्यात आले आहेत जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट ऑईलचा दर खाली आला अशून १०० डॉलर प्रती बॅरल झाला आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु असलेल्या युद्धामुळे कच्च्या तेलाचा भाव १३० डॉलर प्रती बॅरलपर्यंत पोहोचला होता. पण विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कोणतीही वाढ करण्यात आली नव्हती. कच्च्या तेलाची किंमत सध्या ११२ डॉलरच्या घऱात आहे.

डिझेल तब्बल ४० टक्क्यांनी महागलं, घाऊक खरेदीदारांच्या रांगा; किरकोळ विक्रेते पेट्रोल पंप बंद करण्याच्या तयारीत

IOCL च्या माहितीनुसार, देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत आज पेट्रोलचा दर १०९ रुपये ९८ पैशांवरुन वाढून प्रतीलिटर ११० रुपये ८२ पैसे झाला आहे. तर डिझेलचा दर ९५ रुपयांवर पोहोचला आहे. हा दर गेल्या चार महिन्यांपासून ९४ रुपये १४ पैसे होता.

महानगरांमध्ये आज पेट्रोल-डिझेलचा दर काय?

दिल्ली
पेट्रोल- 96.21 रुपये प्रतीलिटर
डिझेल – ८७.४७ रुपये प्रतीलिटर

मुंबई
पेट्रोल- ११०.८२ रुपये प्रतीलिटर
डिझेल – ९५ रुपये प्रतीलिटर

चेन्नई  
पेट्रोल-  १०२.१६ रुपये प्रतीलिटर
डिझेल –  ९२.१९ रुपये प्रतीलिटर

कोलकाता    
पेट्रोल- १०५.५१ रुपये प्रतीलिटर
डिझेल – ९०.६२ रुपये प्रतीलिटर

राज्य स्तरावर इंधनावर लागणार व्हॅट वेगवेगळा असल्या कारणाने शहरांमधील इंधनाच्या दरातही फरक असतो. ३ नोव्हेंबरला केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क हटवल्यानंतर किंमती स्थिर होत्या. बिहार, राजस्थान, मध्य प्रदेशसहित अनेक राज्यांमध्ये पेट्रोल १०० रुपये प्रतिलिटरपेक्षा अधिक दराने विकलं जात आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Petrol diesel price hike iocl cities fuel rate increased 80 paise per litre know crude oil details sgy

ताज्या बातम्या