बुधवारी देशामध्ये पुन्हा एकदा इंधनाचे दर वाढल्याने मुंबईत पेट्रोलची किंमत १०२ रुपये प्रति लिटरपेक्षाही अधिक झालीय. बुधवारी म्हणजेच १६ जून २०२१ रोजी इंडियन ऑइल कॉर्परेशनने पेट्रोलचे दर प्रति लिटरमागे २५ पैशांनी तर डिझेलचे दर १३ पैशांनी वाढवले आहेत. त्यामुळे राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलेचे दर ९६.४१ रुपये प्रति लिटरवरुन ९६.६६ वर पोहचले आहेत. तर दिल्लीतील डिझेलचे दर ८७.२८ रुपये प्रति लिटरवरुन ८७.४१ प्रति लिटरवर पोहचलेत. मुंबईमध्ये आज एक लिटर पेट्रोलसाठी १०२.८२ रुपये मोजावे लागत आहेत. तर डिझेलसाठी ९४.८४ रुपये मोजावे लागताय.

इंडियन ऑइल कॉर्परेशन, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या सरकारच्या मालकीच्या तेल कंपन्या रोज इंधनाचे दर बदलत असतात. जागतिक स्तरावर तेलाचे दर वाढल्याने इंधन दरवाढ होत असल्याचं सांगण्यात येत आहे. रोज सकाळी सहा वाजल्यापासून नवीन दर लागू केले जातात. वेगवेगळ्या राज्यांकडून आकारण्यात येणारे कर हे वेगवेगळे असल्याने देशभरामध्ये राज्यनिहाय दर बदलतात.

sangli ganja seized marathi news
सांगली : मिरजेत अडीच लाखाचा गांजा, नशेच्या गोळ्या जप्त
Central government confirms purchase of five lakh metric tonnes of onions from Maharashtra
निवडणुकीत कांदाखरेदीचा प्रचार? महाराष्ट्रातून पाच लाख मेट्रिक टन कांदाखरेदीची केंद्राची ग्वाही
two thief from kalyan ambernath arrested in housbreaking case
महाराष्ट्रासह तेलंगणामध्ये घरफोड्या करणारे कल्याण, अंबरनाथ मधील दोन अट्टल चोरटे अटकेत
property tax, metro contractors
मेट्रोच्या कंत्राटदारांनी थकवला ३७५ कोटी रुपये मालमत्ता कर, मुंबई महानगरपालिकेची थकबाकीदारांना नोटीस

नक्की वाचा >> करोना, इंधन दरवाढीमुळे महागाई आवरे ना… मे महिन्यात घाऊक महागाईच्या दराने गाठला उच्चांक

आजचे चार मेट्रो शहरांमधील इंधनाचे दर किती?

(माहिती – इंडियन ऑइलकडून साभार)

दिल्ली –
पेट्रोल – ९६.६६ रुपये प्रति लिटर
डिझेल – ८७.४१ रुपये प्रति लिटर

मुंबई –
पेट्रोल – १०२.८२ रुपये प्रति लिटर
डिझेल – ९४.८४ रुपये प्रति लिटर

चेन्नई –
पेट्रोल – ९७.९१ रुपये प्रति लिटर
डिझेल – ९२.०४ रुपये प्रति लिटर

कोलकाता –
पेट्रोल – ९६.५८ रुपये प्रति लिटर
डिझेल – ९०.२५ रुपये प्रति लिटर

महाराष्ट्रातील दर किती?

महाराष्ट्रातील परभणीमध्ये पेट्रोलचे दर १०५.१५ रुपये आणि डिझेलचे दर ९५.६३ रुपयांपर्यंत पोहचलेत. नागपूरमध्ये पेट्रोल मुंबईप्रमाणेच १०२ रुपयांहून अधिक किंमतीला मिळत आहे. नांदेडमध्ये एक लिटर पेट्रोलसाठी जवळजवळ १०५ रुपये मोजावे लागत आहेत. बीड, जालना, सिंधुदुर्ग, यवतमाळमध्येही पेट्रोलचे दर १०४ रुपये प्रति लिटरपेक्षा अधिक आहेत.

अहमदनगर, अमरावती, औरंगाबाद, बुलढाणा, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव, लातूर, उस्मानाबाद, रत्नागिरी, सातारा, सोलापूर, वर्धा, वाशिममध्ये एका लिटर पेट्रोलसाठी १०३ रुपयांपेक्षा अधिक किंमत मोजावी लागत आहे.

मुंबईसोबतच अकोला, चंद्रपुर, धुळे, नवी मुंबई, नाशिक, पालघर, पुणे, रायगड, सांगली, ठाण्यात पेट्रोलचे दर १०२ रुपये प्रति लिटरपेक्षा अधिक आहेत.

राजस्थानमध्ये नवा विक्रम पेट्रोलचे दर १०७ रुपयांहून अधिक

राजस्थानमधील श्रीगंगानगरमध्ये पेट्रोलच्या दराने नवा उच्चांक गाठलाय. येथे एका लिटर पेट्रोलसाठी १०७.७९ रुपये मोजावे लागत आहेत. तर येथे डिझेल १००.५१ रुपये प्रति लिटर दराने मिळत आहे. मध्य प्रदेशमधील अनुपनगरमध्ये पेट्रोल १०७.४३ रुपयांना तर डिझेल ९८.४३ रुपये प्रति लिटर दराने मिळत आहे. रीवामध्ये पेट्रोल १०७.०६ रुपये आणि डिझेल ९८.१० रुपये प्रति लिटर दराने मिळतंय. भोपाळमध्येही पेट्रोलचे दर १०४.८५ रुपये लीटर आणि डिझेल ९६.०५ रुपये लीटर दरात मिळतंय.