केंद्राच्या घोषणेनंतर भाजपाशासित राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी घट; जाणून घ्या देशभरातले इंधन दर

ज्या राज्यांनी आतापर्यंत मूल्यवर्धित कर कमी केला नाही त्यात काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांची सत्ता असलेल्या राज्यांचा समावेश आहे.

lifestyle
सरकारी तेल कंपन्यांनी (IOCL) मंगळवारी पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर केले. (photo: file photo)

केंद्राच्या इंधन दरकपातीच्या घोषणेनंतर भाजपाशासित राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधले पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे ८.७ आणि ९.५२ रुपये प्रतिलीटर ने कमी करण्यात आले आहे. केंद्राने पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात पाच रुपये, तर डिझेलवरील शुल्कात दहा रुपये कपात केली असून, ती गुरुवारपासून लागू करण्यात आली आहे. त्यानिमित्त जाणून घ्या विविध ठिकाणचे पेट्रोल-डिझेलचे दर.

ज्या राज्यांनी अतिरिक्त मूल्यवर्धित कर लाभ दिला आहे त्यात कर्नाटक, पुडुचेरी, मिझोराम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, नागालँड, त्रिपुरा, आसाम, सिक्कीम, बिहार, मध्य प्रदेश, गोवा, गुजरात, दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीव, चंदीगड, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि लडाख यांचा समावेश आहे.

कर्नाटकात मूल्यवर्धित कर कपातीमुळे पेट्रोलच्या दरात ८.६२ रुपये आणि डिझेलच्या दरात ९.४० रुपयांची कपात झाली, तर मध्य प्रदेशने आपल्या नागरिकांना पेट्रोलवर ६.८९ रुपये आणि डिझेलवर ६.९६ रुपये अतिरिक्त सूट दिली. उत्तर प्रदेशने पेट्रोलवरील व्हॅट ६.९६ रुपये आणि डिझेलवर २.४ रुपये प्रति लिटरने कमी केला.मेघालयानेही पेट्रोलवरील व्हॅट २० टक्क्यांवरून १३.५ टक्के प्रति लिटर आणि डिझेलवर १२ टक्क्यांवरून ५ टक्क्यांपर्यंत कमी केला आहे, असे मुख्यमंत्री कॉनरॅड संगमा यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

हेही वाचा – पेट्रोल पाच, डिझेल दहा रुपयांनी स्वस्त

ज्या राज्यांनी आतापर्यंत मूल्यवर्धित कर कमी केला नाही त्यात काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांची सत्ता असलेल्या राजस्थान, पंजाब, छत्तीसगड, महाराष्ट्र, झारखंड आणि तामिळनाडू, दिल्ली, पश्चिम बंगाल, केरळ, ओडिशा, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश यांचा समावेश आहे.
बुधवारच्या उत्पादन शुल्क कपातीमुळे देशभरात पेट्रोलचे दर ५.७ ते ६.३५ रुपये प्रति लिटर आणि डिझेलचे दर ११.१६ ते १२.८८ रुपयांपर्यंत कमी झाले.

शुल्क बदलानंतर, राजस्थानमध्ये सर्वात महाग पेट्रोल १११.१० रुपये प्रति लिटर (जयपूर), त्यानंतर मुंबई (१०९.८ रुपये) आणि आंध्र प्रदेश (१०९.५ रुपये) या दराने विकले जाते. कर्नाटक (रु. १००.५८), बिहार (रु. १०५.९० ), मध्य प्रदेश (रु. १०७.२३) आणि लडाख (रु. १०२.९९) वगळता बहुतांश भाजप शासित राज्यांमध्ये इंधन १०० रुपये प्रतिलीटरच्या खाली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Petrol diesel price low in bjp ruled states in india vsk

Next Story
स.पां.देशपांडे
ताज्या बातम्या