आंतरराष्ट्रीय बाजारात दररोज कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये घट पाहायला मिळत आहे. पण देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती आज सलग १८व्या दिवशीही स्थिर आहेत. या महिन्यात आतापर्यंत सरकारी तेल कंपन्यांकडून पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणतीही घट करण्यात आलेली नाही.
केंद्र सरकारनं दिवाळीपूर्वी पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादन शुल्कात घट केल्याने पेट्रोल-डिझेल स्वस्त झालं होतं.

WTI क्रूडच्या किमतींमध्ये आज ०.४५ टक्क्यांची घट झाली आहे. ७५.६० डॉलर प्रति बॅरलनं विकलं जात आहे. याव्यतिरिक्त ब्रेंट क्रूडच्या किमतींमध्ये ०.४९ टक्क्यांची घट पाहायला मिळाली आहे. त्यानंतर याची किंमत ७५.६०डॉलर प्रति बॅरल इतकी झाली आहे.

जाणून घ्या इंधनाचे नवे दर

देशात आज पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. आज मुंबईत पेट्रोलची किंमत १०९.९८ रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलची किंमत ९४.१४ रुपये प्रति लिटर इतकी आहे. तर दिल्लीत पेट्रोलची किंमत १०३.९७ रुपये प्रति लिटर, तर डिझेलची किंमत ८६.६७ रुपये प्रति लिटर इतकी आहे. तर चेन्नईमध्ये पेट्रोल १०१.४० रुपये प्रति लिटरनं आणि डिझेल ९१.४३ रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे. तर कोलकातामध्ये डिझेलची किंमत ८९.७९ रुपये आणि पेट्रोल १०४.६७ रुपयांनी विकलं जात आहे.

केंद्र सरकारनं दिवाळीच्या एक दिवस आधी पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात ५ रुपये प्रति लिटर, तर डिझेलवर १० रुपये प्रति लिटर कपात केली होती. त्यानंतर अनेक राज्यांनीही पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी करत सातत्यानं वाढणाऱ्या पेट्रोल-डिझेलच्या किमतींपासून दिलासा दिला होता.

अनेक शहरांत पेट्रोल अजूनही शंभरीपार

मध्यप्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगाना, कर्नाटक, ओडिशा, जम्मू-कश्मीर आणि लद्दाखमध्ये पेट्रोलचे दर १०० रुपयांहूनही अधिक आहेत. मुंबईतील पेट्रोलचे दर सर्वाधिक आहेत.