इंधनाच्या किमतीचा देशात नवा उच्चांक, मुंबईत पेट्रोलचा भाव पोहचला तब्बल १११ रुपयांवर…

पेट्रोलच्या किंमतीत ३० ते ३५ आणि डिझेलच्या किंमतीत ३३ ते ३७ पैशांची दरवाढ, दरवाढीचा हा सलग तिसरा दिवस

Petrol, diesel prices highest ever

इंधन दरवाढीचे सत्र सलग तिसऱ्या दिवशी कायम राहीलं असून पेट्रोल आणि डिझेलचे दर देशात हे सर्वाच्च पातळीवर पोहचले आहेत. पेट्रोलच्या दरात लिटरमागे ३० ते ३५ पैशांची वाढ झाली आहे, तर डिझेलमध्ये ३३ ते ३७ पैसे दरवाढ झाली आहे.

देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोलची किंमत ही उच्चतम पातळीवर असून, आज तिथे १०५.४९ रुपये प्रति लिटरसाठी मोजावे लागत आहेत. तर डिझेलच्या बाबतीतही हिच परिस्थिती असून ३५ पैशाची वाढ झाल्याने एक लिटर डिझेलसाठी ९४.२२ रुपये मोजावे लागत आहेत. देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये इंधनाच्या दराची चढती कमान कायम राहीली असून मुंबई हे दराच्या बाबतीत राजधानी दिल्लीच्या कितीतरी पुढे राहिलं आहे. ताज्या ३४ पैशांच्या दरवाढीमुळे मुंबईत पेट्रोल १११.४३ रुपयांना मिळत आहे तर ३७ पैशांच्या दरवाढीमुळे डिझेलची किंमत ही १०२.१५ एवढी झाली आहे. 

तर देशातील तिसऱ्या क्रमांकाचे महानगर असलेल्या कोलकतामध्ये पेट्रोल आणि डिझेलसाठी अनुक्रमे १०६.१० आणि ९७.३३ रुपये हे प्रति लिटरमागे मोजावे लागत आहेत. तर चैन्नईत पेट्रोलचे १०२.७० तर डिझेलचे ९८.५९ रुपये प्रति लिटर हे दर आहेत.

देशात हिमाचल, आंध्र प्रदेशसारखी राज्य वगळता सर्वच राज्यात पेट्रोलचे दर १०० रुपयांच्या पुढे आहेत तर ८ राज्यात डिझेलचे दर शंभरीच्या पार आहेत. दर वाढ कायम राहीली तर अनेक ठिकाणी पुढच्या काही दिवसांत डिझेल हे १०० चा टप्पा सहज पार करेल अशी परिस्थिती आहे.

गेल्या काही दिवसात पेट्रोलच्या दरात १५ वेळा तर डिझेलच्या दरात १८ वेळा वाढ झाली आहे. 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Petrol diesel prices highest ever asj82

Next Story
बराक ओबामा यांची रोम्नींवर टीका