scorecardresearch

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ, गेल्या १० दिवसांत साडे सहा रुपयांनी महागलं; दर पाहून वाढेल चिंता

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात जवळपास एक रुपयांची वाढ

जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात.

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज पुन्हा एकदा वाढ झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलीटर ८० पैशांची वाढ झाली आहे. गेल्या १० दिवसांत नवव्यांदा इंधनाचे दर वाढले आहेत. यामुळे फक्त गेल्या १० दिवसांत इंधन तब्बल ६ रुपये ४० पैशांनी महागलं आहे.

इंधनाचे दर वाढले असल्याने दिल्लीत पेट्रोलचा दर प्रतिलीटर १०१ रुपये ८१ पैसे झाला आहे. याआधी हा दर १०१ रुपये १ पैसे होता. तर दुसरीकडे डिझेलचा दर प्रतिलीटर ९२ रुपये ७ पैशांवर पोहोचला आहे. याआधी हा दर ९३ रुपये ७ पैसे होता.

मुंबईबद्दल बोलायचं गेल्यास ८० पैशांची वाढ झाल्यानंतर एक लीटर पेट्रोल आणि डिझेलसाठी तब्बल ११६ रुपये ७२ पैसे आणि १०० रुपये ९४ पैसे मोजावे लागणार आहेत.

संपूर्ण देशभरात हे दर वाढवण्यात आले आहेत. दरम्यान संबंधित राज्यातील स्थानिक करांच्या आधारे त्यांचे दर वेगवेगळे असतात. २२ मार्चपासून आतापर्यंत नवव्यांदा इंधनाच्या दरात ही वाढ झाली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Petrol diesel prices hiked by nearly a rupee 9th rise in 10 days sgy

ताज्या बातम्या