देशातले पेट्रोल-डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढतच आहेत. एक लीटर पेट्रोलही आता सामान्यांच्या आवाक्याबाहेर जात आहे. पेट्रोल-डिझेलने देशभरात १०० चा आकडा केव्हाच पार केला असून तो अजूनही वाढतच आहे. जाणून घ्या देशातल्या प्रमुख शहरांमधले इंधन दर.

दिल्लीमध्ये एक लीटर पेट्रोलसाठी आता १०९.३४ रुपये मोजावे लागणार असून डिझेलचा दर ९८.०७ रुपयांवर पोहोचला आहे. तर मुंबईत पेट्रोल ११५.१५ हजार प्रती लीटरवर पोहोचलं आहे, डिझेलची प्रती लीटर किंमत १०६.२३ रुपये झाली आहे. कोलकत्त्यामध्ये पेट्रोलचा प्रती लीटर दर १०९.८० असून डिझेल १०१.१९ रुपये प्रती लीटर आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल प्रती लीटर १०६.०४ रुपये लीटर असून डिझेल १०२.२५ रुपये आहे.

जाणून घ्या तुमच्या शहरामधील दर..

देशामधील तिन्ही तेल कंपन्या एचपीसीएल, बीपीसीएल आणि आयओसी रोज सकाळी सहा वाजता इंधनाच्या नवीन दरांची घोषणा करतात. या नव्या दरांची माहिती त्यांच्या वेबसाईटवर मिळते. तर दुसरीकडे फोनवरही एसएमएस करुन नवीन दर तपासण्याची सुविधा देण्यात आलीय. 92249 92249 क्रमांकावर एसएमएस पाठवून पेट्रोल डिझेलच्या नवीन दरांबद्दल माहिती मिळवता येते. RSP < स्पेस > पेट्रोल पंप डिलरचा कोड लिहून 92249 92249 वर पाठवावा.