मुंबईत पेट्रोलचा दर १५ पैशांनी महाग झाला आहे. आता प्रति लिटर पेट्रोल ८९.६९ रुपये आहे. दोन दिवसांपूर्वी हा दर ८९ रुपये ५४ पैसे प्रति लिटर होता. तर डिझेलचे दर दोन दिवसांपूर्वी जे होते तेच आजही आहेत डिझेलचा प्रति लिटर दर हा आजही ७८ रुपये ४२ पैसे इतकाच आहे. दिल्लीत पेट्रोल प्रति लिटर ८२ रुपये ३२ पैसे झाले आहे तर डिझेल ७३ रुपये८७ पैसे झाले आहे. दिल्लीतही पेट्रोल १० पैशांनी महागले आहे. तर डिझेलचा दर जैसे थे आहे.

मुंबईत मंगळवारी पेट्रोल १० पैशांनी तर डिझेल ९ पैशांनी महागले होते. मुंबईत मंगळवारी पेट्रोलचा प्रति लिटर दर ८९ रुपये ५४ पैसे तर डिझेलचा प्रति लिटर दर ७८ रुपये ४२ पैसे इतका होता. प्रत्येक महिन्याच्या १ आणि १६ तारखेला इंधनदरांचा आढावा घेण्याची पद्धत इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियमने गेल्या वर्षी जूनमध्ये मोडीत काढली. तेव्हापासून दररोज सकाळी ६ वाजता इंधनदराचा आढावा घेण्याची पद्धत सुरू आहे. त्यानुसार नवी इंधन दरवाढ जाहीर करण्यात आली होती. आता आज जाहीर झालेल्या दरांमध्ये मुंबईत पेट्रोल १५ पैशांनी महाग झाले आहे.डिझेलचे दर मात्र जैसे थे आहेत. बुधवार आणि गुरुवार या दोन दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ झाली नव्हती. आता दोन दिवसांनी मात्र पेट्रोल १५ पैशांनी महाग झाल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे.