पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्याचा निर्णय तेल कंपन्यांनी घेतला आहे. पेट्रोल प्रतिलिटर ७४ पैशांनी तर डिझेल प्रतिलिटर १.३० पैशांनी स्वस्त होणार असून शुक्रवारी मध्यरात्रीपासून नवे दर लागू होणार आहेत. काही दिवसांपूर्वीच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर पहिल्यांदाच या दोन्ही इंधनांच्या दरात कपात करण्यात आली आहे.