वाहनधारकांसाठी खुशखबर आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी कपात करण्यात आली आहे. पेट्रोलचे दर २.४२ तर, डिझेलचे दर २.२५ रुपयांनी स्वस्त होणार आहे. मंगळवारी मध्यरात्रीपासून नवे लागू होणार आहेत.
याआधी मकरसंक्रातीच्या दुसऱयाच दिवशी म्हणजे १६ जानेवारी रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट करण्यात आली होती. महत्त्वाचीबाब म्हणजे, सर्वसाधारणपणे दर महिन्याच्या १५ तारखेला किंवा महिनाअखेरीस या किमती जाहीर केल्या जातात. मात्र, यावेळी महिन्याच्या सुरूवातीलाच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामागे काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीचे कारण असल्याचे बोलले जात आहे.
पेट्रोल-डिझेल दरकपातीची आकस्मिकता तोटा देणारी..
मागील वेळेस दरात घट केल्यानंतर त्वरित अबकारी करात वाढ करण्यात आली होती. परंतु, यावेळी मात्र अद्याप असा निर्णय घेण्यात आलेला नाही.