Pfizer ची कोविड लस ५-११ वर्षे वयोगटातील मुलांसाठी सुरक्षित – क्लिनिकल ट्रायलचा रिझल्ट!

लवकरच मान्यतेसाठी नियामकांकडे पाठवली जाईल.

(संग्रहीत छायाचित्र)

फायझर अॅण्ड बायोटेकने सोमवारी सांगितले की, चाचणीच्या निकालांवरून असे दिसून आले आहे की त्यांची करोना प्रतिबंधात्मक लस सुरक्षित असून आणि ५ ते ११ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये एक शक्तीशाली रोगप्रतिकारक शक्ती निर्माण केली आहे आणि लवकरच मान्यतेसाठी नियामकांकडे पाठवली जाईल. तसेच, १२ वर्षांवरील लोकांच्या तुलनेत कमी प्रमाणात ही लस दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

पाच ते ११ या वयोगटातील मुलांसाठी ही लस सुरक्षित आहे. परिणामकारता चांगली असून करोना रोखण्यास मदत होणार आहे., असं अमेरिकन कंपनी फायझर आणि त्यांच्या जर्मन सहकाऱ्यांनी संयुक्त निवेदनात म्हटलं आहे.

युरोपियन युनियन, युनायटेड स्टेट्स आणि जगभरातील नियामक संस्थांना त्यांचा डेटा “शक्य तितक्या लवकर” सादर करण्याची त्यांची योजना आहे. तर, १२ वर्षाखालील मुलांसाठी चाचणीचे निकाल त्यांच्या प्रकारातील पहिले आहेत, सहा ते ११ वर्षांच्या मुलांसाठी मॉडर्ना चाचणी अद्याप चालू आहे.

फायझर आणि मॉडर्ना या दोन्ही जॅब्स आधीच १२ वर्षांवरील किशोरवयीनांन आणि जगभरातील प्रौढांना दिले जात आहेत.जरी लहान मुलांना गंभीर कोविडचा धोका कमी मानला जात असला तरी, चिंता आहे की अत्यंत संक्रामक डेल्टा प्रकारामुळे अधिक गंभीर प्रकरणे निर्माण होऊ शकतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Pfizer covid vaccine safe for children aged 5 to 11 clinical trial results msr

ताज्या बातम्या
फोटो गॅलरी