अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारचा प्रभारी अंतर्गत मंत्री सिराजुद्दीन हक्कानी याचे छायाचित्र तालिबानने प्रथमच शनिवारी प्रसिद्ध केले आहे. हक्कानी याला संयुक्त राष्ट्रांनी २००७ मध्येच जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केले असून अमेरिकेने त्याला पकडण्यासाठी एक कोटी डॉलरचे इनामही जाहीर केलेले आहे.

हक्कानी हा हक्कानी नेटवर्क या वेगाने प्रसार होत असलेल्या इस्लामी दहशतवादी माफिया गटाचाही प्रमुख आहे. या गटाची अल कैदाशी जवळीक आहे. पाकिस्तानच्या उत्तर वझिरीस्तानमध्ये या गटाचा तळ आहे. 

russian soldier
‘रशियात अडकलेल्या २० भारतीयांच्या सुटकेसाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न’, परराष्ट्र खात्याची माहिती
Case against Sudhakar Badgujar
सुधाकर बडगुजर यांच्याविरोधात गुन्हा, सलीम कुत्ता पार्टी प्रकरण
Kangana Ranaut
चित्रपटसृष्टीने आपल्याला अनेकदा अपमानित केले, कंगना राणावतचा न्यायालयात दावा
pm modi launches infrastructure projects in tamil nadu
मोदींच्या हस्ते तामिळनाडूत १७,३०० कोटींच्या नव्या प्रकल्पांचे भूमिपूजन; काँग्रेस आणि द्रमुकवर टीकास्त्र

 काबूलमध्ये ५ मार्च रोजी झालेल्या पोलीस अकादमीच्या दीक्षांत समारंभाचे हक्कानी हा उद्घाटन करीत असल्याचे हे छायाचित्र आहे. तालिबान सरकारने आपल्या अंतर्गत मंत्र्यांचे छायाचित्र प्रथमच प्रसिद्ध केले आहे. इस्लामिक एमिरेट ऑफ अफगाणिस्तानचा प्रवक्ता झबिऊल्ला मुजाहिद याने हे छायाचित्र ट्वीट केले.

दीड दशके अमेरिकेकडून शोध

अमेरिकेने हक्कानी याला ताब्यात घेण्यासाठी दीड दशके प्रयत्न केले. पण त्याचा एका बाजूचा चेहरा शालीने झाकल्याचे छायाचित्रच अमेरिकेकडे होते. अफगाणिस्तानमधील भारताच्या अनेक मालमत्तांवर हल्ले केल्याचे कट हक्कानी याने रचल्याचा भारताचा आरोप आहे. यात दूतावासावरील हल्ल्याचाही समावेश आहे. भारताकडेही हक्कानी याचा चेहरा स्पष्टपणे दिसेल असे छायाचित्र नव्हते. २०२१ मध्ये तालिबानचे सरकार स्थापन झाल्यावरही हक्कानी याचे छायाचित्र प्रसिद्ध होऊ नये, अशी दक्षता तालिबानने घेतली होती. त्याचा चेहरा अस्पष्ट केला जात असे, किंवा झाकला तरी जात असे.