वंदे मातरम् या गीताला भारतीय राष्ट्रगीतासारखाच दर्जा देण्यात यावा या मागणीला घेऊन दिल्ली उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. अश्विनी कुमार उपाध्याय यांनी ही याचिका दाखल केली असून वकील आणि भाजपा नेते आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> काँग्रेसचा राजीनामा देताच कपिल सिब्बल यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “मोदी सरकार…”

याचिकाकर्ते अश्विनी कुमार उपाध्याय यांनी वंदे मातरम् या गीताला जन गण मन या राष्ट्रगीतासारखाच दर्जा देण्यात यावा अशी जनहित याचिकेद्वारे मागणी केली आहे. “भारत देश एक संघराज्य आहे. देशात सर्वांचे राष्ट्रीयत्व एकच आहे. त्यामुळे वंदे मातरम् या गीताचा आदर करणे हे सर्वांचेच कर्तव्य आहे,” असे अश्विनी कुमार उपाध्याय यांनी याचिकेत म्हटले आहे.

हेही वाचा >>> पोस्टमास्तरने आयपीएल सट्टेबाजीमध्ये २४ कुटुंबांच्या एफडी लावल्या पणाला; एक कोटी रुपयांचे नुकसान

तसेच, “देशाला एकसंध ठेवण्यासाठी जन गण मन आणि वंदे मातरम् या गीताचा प्रसार आणि प्रचार करणे हे सरकारचे कर्तव्य आहे. हे दोन्ही गीत संविधान निर्मात्यांनी ठरविलेले आहेत. त्यामुळे या गीतामुळे कोणाच्याही भावना दुखावण्याचे कारण नाही,” असेदेखील या याचिकेत म्हणण्यात आले आहे.

हेही वाचा >>> जिल्ह्याचं नाव बदलल्याने संतप्त लोकांनी मंत्र्याचं घर पेटवलं; पोलिसांच्या गाडीलाही लावली आग; २० हून अधिक पोलीस जखमी

“जन गण मन या राष्ट्रगीतामध्ये देशाला समोर ठेवून भावना व्यक्त करण्यात आल्या आहेत. तर दुसरीकडे वंदे मातरम् या गीतात राष्ट्राचे चारित्र्य आमि विशेषता याबद्दल सांगण्यात आले आहे. त्यामुळे वंदे मातरम् या गीतालादेखील समान सन्मान मिळायला हवा. काही वेळा अनुमती नसलेल्या परिस्थितीत वंदे मातरम् हे गीत गायले जाते. या गीताचा आदर राखने हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे,” असेदेखील या याचिकेत म्हणण्यात आले आहे.

या याचिकेवर सुनावणीदरम्यान दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली आहे. या याचिकेबाबत भूमिका मांडण्यासाठी सरकारला सहा आठवड्यांचा कालावधी देण्यात आला आहे. या याचिकेवर ९ नोव्हेंबर २०२२ रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pil moves in delhi high court seeks equal status and respect to vande mataram as of jan gan maan prd
First published on: 25-05-2022 at 16:27 IST