इस्तंबूलमध्ये भीषण दुर्घटना, अपघातानंतर विमानाचे तीन तुकडे; १७९ प्रवासी जखमी

तीन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, तर १७९ जण जखमी आहेत

तुर्की येथील इस्तंबूल विमानतळावर भीषण दुर्घटना झाली आहे. धावपट्टीवर विमान घसरल्याने झालेल्या अपघातात तीन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, तर १७९ जण जखमी आहेत. दुर्घटना इतकी भीषण होती की, अपघातानंतर विमानाचे अक्षरश: तीन तुकडे झाले. विमानाचं लँडिंग होत असताना हा अपघात झाला. जखमी प्रवाशांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं होतं. यावेळी तिघांचा मृत्यू झाला.

बोईंग ७३७ हे प्रवासी विमान लँडिंग करत असताना धावपट्टीवर घसरलं. हे विमान पेगासस एअरलाइन्सचं आहे. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, विमानात एकूण १८३ प्रवासी होते. विमानाचं लँडिंग करण्यात येत होतं तेव्हा तुफान पाऊस सुरु होता. तसंच वाऱ्याचा जोरही वाढला होता. विमानाचा अपघात झाल्यानंतर त्याचे तीन तुकडे झाले. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दाखवलेल्या दृश्यांमध्ये अपघातानंतर प्रवासी अपघातग्रस्त विमानातून बाहेर पडण्यासाठी धडपड करत असल्याचं दिसत आहे.

अपघात झाल्यानंतर विमानाला आग लागली होती. मात्र अग्निशमन दलाने तात्काळ आगीवर नियंत्रण मिळवलं. तुर्कीच्या आरोग्य मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून १७९ जण जखमी झाले आहेत. परिवहन मंत्र्यांनी सांगितल्यानुसार, लँडिंगनंतर एक मोठा स्फोट झाला ज्यामुळे विमानाचे तीन तु़कडे झाले. दरम्यान याप्रकरणी चौकशी सुरु आहे.

दुर्घटनेनंतर विमानतळ बंद करण्यात आलं असून इतर विमानांचा मार्ग बदलण्यात आला आहे. विमानात तुर्कीमधील प्रवाशांची संख्या जास्त होती. यामध्ये एकूण २० परदेशी नागरिक होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Plane skids off runway broke into three pieces after landing in istanbul sgy

Next Story
बराक ओबामा यांची रोम्नींवर टीका
ताज्या बातम्या