“जोपर्यंत उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसचे सरकार स्थापन होत नाही, तोपर्यंत…”; ७० वर्षीय काँग्रेस कार्यकर्त्याने घेतली शपथ

उत्तर प्रदेशात काँग्रेस गेल्या ३२ वर्षांपासून सत्तेबाहेर आहे. १९८९ मध्ये सत्तेतून बाहेर पडल्यानंतर पक्षाकडे कोणतीही व्होट बँक नाही

Pledge gulab sonkar Varanasi congress government formed campaigns barefoot

उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस २०२२च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी  आपली बाजू मजबूत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. प्रियांका गांधी, राहुल गांधी आणि काँग्रेसचे इतर तगडे नेते उत्तर प्रदेशात आपली पूर्ण ताकद लावत आहेत. सध्याच्या पक्षाच्या अध्यक्ष्या सोनिया गांधी यांचा बालेकिल्ला असणाऱ्या रायबरेलीमध्ये भाजपाने प्रवेश केल्यापासून काँग्रेसचा सर्वात मजबूत दुवा म्हणजे त्यांचे जुने कार्यकर्ते अद्यापही राज्यात भाजपाला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

पन्नास वर्षे काँग्रेस सोडून इतर कोणत्याही पक्षाचा विचार न करणारे वाराणसीनचे गुलाब सोनकरही याच कार्यकर्त्यांपैकी एक आहेत. ७० पेक्षा जास्त वय असलेले गुलाब सोनकर इंदिरा गांधींच्या काळापासून काँग्रेस पक्षासोबत जोडले गेलेले आहेत. अनेक सरकारे आली आणि गेली, अनेक पक्ष बनले आणि संपले, पण गुलाब सोनकर यांनी काँग्रेसचा झेंडा सोडलेला नाही. त्यामुळेच आजही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बालेकिल्ला असलेल्या वाराणसीमध्ये काँग्रेसचा आवाज बुलंद करण्यासाठी गुलाब सोनकर प्रचार करताना दिसत आहेत.

वाराणसी येथील जिल्हा मुख्यालयापासून १२ किमी अंतरावर असलेल्या मांडूवाडीह परिसरात राहणारे गुलाब सोनकर हा फळे आणि भाजीपाला विकण्याचे काम करत होते. पण वय वाढल्याने मुलाने त्यांना घरी राहून विश्रांती घेण्यास सांगितले. पण गुलाब यांनी जुना काँग्रेसी असल्याचे म्हणत विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसचा झेंडा फडकवण्याचा निर्धार केला आहे आणि त्यासाठी ते वाराणसीच्या रस्त्यांवर प्रचार करण्यासाठी सकाळीच घरातून बाहे पडतात.

महत्त्वाची बाब म्हणजे ते अनवाणीच पक्षाच्या प्रचारासाठी जात आहेत. गुलाब यांनी प्रदेशात काँग्रेसचे सरकार येईपर्यंत तोपर्यंत चप्पल घालणार नाही, अशी शपथ त्यांनी घेतली आहे.

दरम्यान, सत्तेपर्यंत पोहोचण्यासाठी काँग्रेसला किमान पाच पटीने मताधिक्य वाढवावे लागेल. २०१७च्या निवडणुकीत समाजवादी पक्षाशी युती करूनही काँग्रेसला केवळ सहा टक्के मते मिळाली होती. अशा परिस्थितीत प्रियांकाला मतांची टक्केवारी सहा टक्क्यांवरून ३० टक्क्यांपर्यंत वाढवावी लागेल. राज्यातील संघटनेची स्थिती लक्षात घेता महिला केंद्रित अभियान असूनही ध्येय सोपे नाही.

उत्तर प्रदेशात काँग्रेस गेल्या ३२ वर्षांपासून सत्तेबाहेर आहे. १९८९ मध्ये सत्तेतून बाहेर पडल्यानंतर पक्षाकडे कोणतीही व्होट बँक नाही. एकेकाळी दलित आणि मुस्लिमांची व्होटबँक काँग्रेसकडे होती मात्र आता ती ढासळली आहे. सतत सत्तेबाहेर राहिल्याने मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि नेतेही इतर पक्षात स्थलांतरित झाले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Pledge gulab sonkar varanasi congress government formed campaigns barefoot abn