pm modi commented on metro rail students and damage of public property | Loksatta

“मेट्रो कशी तयार होते हे विद्यार्थ्यांना दाखवा, म्हणजे ते…”, पंतप्रधान मोदींनी ‘या’ समस्येवर सुचवला उपाय

मेट्रोचे काम कसे चालते याबाबत प्रश्न विचारण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विद्यार्थ्यांना केले आहे

“मेट्रो कशी तयार होते हे विद्यार्थ्यांना दाखवा, म्हणजे ते…”, पंतप्रधान मोदींनी ‘या’ समस्येवर सुचवला उपाय
(फोटो सौजन्य- एएनआय)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमध्ये अहमदाबाद मेट्रो प्रकल्पाच्या थलतेज ते वस्त्रल या पहिल्या टप्प्यातील मार्गाचे उद्घाटन केले. या कार्यक्रमात मोदींनी विद्यार्थ्यांना मेट्रोचे काम कसे चालते याबाबत प्रश्न विचारण्याचे आवाहन केले. मेट्रो रेल्वेच्या कामांबाबत माहिती झाल्यानंतर सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करताना विद्यार्थ्यांना संकोच वाटेल, असे मोदी म्हणाले आहेत.

विमानाने प्रवास करणाऱ्यांनी एकदा ‘वंदे भारत’ ट्रेनने प्रवास केला तर..; पंतप्रधान मोदींचा दावा

“नववी ते बारावी आणि अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी मेट्रोच्या कामांबाबत विचारले पाहिजे. त्यासाठी लागणारा खर्च, बोगद्यांचे बांधकाम याविषयी त्यांना प्रश्न पडले पाहिजे. यामुळे विद्यार्थ्यांना जबाबदारीचे भान तर राहणारच शिवाय सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करणाऱ्या आंदोलनांमध्ये ते सहभाग घेणार नाहीत. अशाप्रकारे नुकसान झाल्यास स्वत:च्या मालमत्तेचे नुकसान झाल्यासारखा त्यांना त्रास होईल”, असे मोदी या कार्यक्रमात म्हणाले आहेत. या कार्यक्रमात पंतप्रधानांनी गांधीनगर आणि अहमदाबाद या जुळ्या शहरांच्या विकासाच्या मॉडेलचे कौतुक केले. आत्तापर्यंत लोक न्यूयॉर्क, न्यूजर्सीबाबत बोलायचे. मात्र, आता या शर्यतीत माझा भारत देशदेखील मागे नाही, असे गौरवोद्गार यावेळी मोदी यांनी काढले.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कालूपूर स्थानकात मेट्रो प्रकल्पाच्या पूर्व-पश्चिम कॉरिडोरचेही शुक्रवारी उद्घाटन केले. या स्थानकात मोदी आजपासून सुरू झालेल्या गांधीनगर ते मुंबई सेंट्रल ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसने पोहोचले होते. या एक्स्प्रेसचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
“जरा इकडे लक्ष दे”, जोडलेले हात सोडून अमित शाह कॅमेऱ्यासमोरच जय शाहांवर संतापले; Video व्हायरल, काँग्रेसनेही मारला टोमणा

संबंधित बातम्या

“फ्रिजमध्ये श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे होते पण…”, आफताबच्या दुसऱ्या गर्लफ्रेंडने सांगितले धक्कादायक अनुभव
“मी तो पक्षी आहे, ज्याचे घरटे…”, NDTV चा राजीनामा दिल्यानंतर रवीश कुमार भावूक
Gujarat Election: काँग्रेस खासदार इम्रान प्रतापगढींच्या जाहीर सभेत गोंधळ, AIMIM वर टीका करताच…
“१०० तोंडांचे रावण” म्हणणाऱ्या मल्लिकार्जुन खरगेंना पंतप्रधान मोदींचे प्रत्युत्तर; म्हणाले, “काँग्रेसमध्ये स्पर्धा लागली की…”
कंबरेला Paytm QR कोड बांधून उच्च न्यायालयाचा शिपाई घेता होता पैसे; न्यायाधीशांनी सुनावली शिक्षा, नेमकं काय आहे प्रकरण?

व्हिडिओ

ताज्या बातम्या
Akshaya Hardeek Wedding Live : ‘आली लग्नघटी समीप..” अक्षया देवधर हार्दिक जोशी अडकणार विवाहबंधनात
विश्लेषण: ‘Gaslighting’ ठरला Word Of The Year! अर्थ वाचून नक्कीच श्रद्धा वालकर प्रकरणाची आठवण येईल
Fifa World Cup 2022 : जपानचा स्पेनवर विजय, जर्मनी थेट स्पर्धेबाहेर
विवाह समुपदेशन: भांडणांत मुलांची मधस्थी नकोच नातेसंबंध,
पाथरीकरांची ‘श्रद्धा’ पण शासनाची ‘सबुरी’!; साईबाबा तीर्थक्षेत्र आराखडा तीन वर्षांपासून रखडला