पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पंतप्रधान डिजीटल आरोग्य योजनेचा आज शुभारंभ करण्यात आला. यावेळी पंतप्रधानांनी जनतेला संबोधित केलं. यावेळी बोलताना त्यांनी आरोग्यसेतू, कोविन सारख्या डिजीटल सुविधांच्या करोनाकाळातल्या कामगिरीचं कौतुक केलं आहे. तर करोना काळात टेलिमेडिसीनच्याही वापरात वाढ झाली असून ई-संजीवनी सुविधेचा लाभही अनेकांना झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. तसंच देशातल्या डॉक्टर,नर्सेससह सर्व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे आभार मानले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यावेळी बोलताना ते म्हणाले, आयुष्मान भारत डिजीटल मिशन आता देशवासियांना आता डिजीटल हेल्थ आयडी मिळेल. प्रत्येक नागरिकाचं हेल्थ रेकॉर्ड डिजीटली सुरक्षित राहील. यामुळे रुग्ण आणि डॉक्टर दोघेही रुग्णाच्या आरोग्यस्थितीबद्दलची माहिती घेऊ शकतील. डॉक्टर, नर्स आणि पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांची नोंदणीही या प्रणाली द्वारे केली जाणार आहे. तसंच दवाखाने, औषधाची दुकाने, लॅबोरेटरी, प्रत्येक गोष्ट या प्रणालीच्या माध्यमातून नोंदणीकृत होणार आहे आणि एकाच छताखाली देशवासियांना आरोग्यविषयक सर्व सुविधा मिळणार आहेत. त्यामुळे देशाच्या कोणत्याही भागात रुग्णांना डॉक्टर शोधत बसण्याची गरज भासणार नाही. फक्त डॉक्टरच नव्हे तर मेडिकल आणि चाचण्यांसाठीच्या लॅब्सही या प्रणालीच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm modi digital health mission inauguration vsk
First published on: 27-09-2021 at 12:00 IST