दिल्लीत भाजपा मुख्यालयातील कार्यालयाचं विस्तारीकरण करण्यात येणार आहे. त्याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं. या कार्यालयाचा आत्मा हा आपला कार्यकर्ता आहे. हे केवळ इमारतीचा विस्तार नसून, प्रत्येक कार्यकर्त्याच्या स्वप्नांचा विस्तार आहे, असं पंतप्रधानांनी संबोधित करताना सांगितलं. "जनसंघाची सुरूवात दिल्लीतील अजमेरी गेटजवळील एका छोट्या कार्यालयातून झाली. तेव्हा देशासाठी मोठी स्वप्न पाहणारा छोटा पक्ष होता. आपला तो पक्ष आहे, ज्यानं आणीबाणीच्या काळात स्वत:च्या पक्षाचं बलिदान दिलं. आपल्या पक्षाने लोकसभेच्या दोन जागांसह प्रवास सुरू केला होता. आज आपल्या ३०३ जागा आहेत," असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं. हेही वाचा : बंगला रिकामा करण्याच्या नोटीसला राहुल गांधींनी दिलं उत्तर; म्हणाले, “गेल्या चार टर्मपासून…!” "१९८४ साली दंगलीनंतर झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला मोठं बहुमत मिळालं होतं. काँग्रेसच्या लाटेसमोर आपला पक्ष संपला होता. परंतु, आम्ही कधीही आशा सोडली नाही. आम्ही जमिनीवर काम करत संघटना मजबूत केली," असं पंतप्रधान म्हणाले. हेही वाचा : किम जोंग-उनचा नवा कारनामा; ६५३ गोळ्यांसाठी अख्खं शहरच बंद केलं! दारोदार हिंडतायत कोरियन सैनिक! "कुटुंबाला संधी देणाऱ्या पक्षांपैकी भाजपा हा असाच एकच पक्ष आहे, जो तरूणांना संधी देतो. भारतातील माता-भगिनींचे भाजपावर आशीर्वाद आहेत. भाजपा हा जगातील नाहीतर भविष्यातील सर्वात मोठा पक्ष असेल," असेही पंतप्रधान मोदींनी सांगितलं.