scorecardresearch

“नरेंद्र मोदी पृथ्वीवरील सर्वात शक्तीशाली व्यक्तींपैकी एक”, इंग्लंडच्या संसदेत ब्रिटिश खासदाराची स्तुतीसुमनं; म्हणाले, “रेल्वे स्टेशनवर…”

“येणाऱ्या काही दशकांत ब्रिटन हा भारताचा सर्वात जवळचा अन्…”

“नरेंद्र मोदी पृथ्वीवरील सर्वात शक्तीशाली व्यक्तींपैकी एक”, इंग्लंडच्या संसदेत ब्रिटिश खासदाराची स्तुतीसुमनं; म्हणाले, “रेल्वे स्टेशनवर…”
पंतप्रधान नरेंद्र मोदी ( संग्रहित छायाचित्र )

पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना २००२ मध्ये तेथे दंगल उसळली होती. त्या दंगलीशी संबंधित काही घटकांवर आधारित ‘इंडिया: द मोदी क्वेश्चन’ हा दोन भागांचा माहितीपट ‘बीबीसी’ने प्रसारित केला आहे. यावरून वाद सुरु असून, केंद्र सरकारने त्यावर आक्षेप घेतला आहे. अशातच ब्रिटीश खासदार लॉर्ड करण बिलिमोरिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर स्तुतीसुमने उधळली आहेत. पंतप्रधान मोदी हे पृथ्वीवरील सर्वात शक्तीशाली व्यक्तींपैकी एक आहेत, असं लॉर्ड करण बिलिमोरिया यांनी म्हटलं.

इंग्लडच्या संसदेत बोलताना लॉर्ड करण बिलिमोरिया यांनी सांगितलं की, “नरेंद्र मोदींनी गुजरातमधील रेल्वे स्टेशनवर वडिलांबरोबर चहा विकला. आज भारताचे पंतप्रधान म्हणून पृथ्वीवरील सर्वात शक्तीशाली व्यक्तींपैकी एक आहेत. भारताकडे सध्या जी-२० चे अध्यक्षपद आहे. येत्या २५ वर्षात ३२ अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचं भारताचं लक्ष्य आहे. ‘इंडियन एक्स्प्रेस’न स्टेशन सोडलं आहे.”

हेही वाचा : धीरेंद्र कृष्ण महाराजांची कमाई आयटी कंपनीतल्या अधिकाऱ्यापेक्षा जास्त! एक कथा सांगण्यासाठी घेतात ‘इतके’ रुपये

“भारत ही जगातील सर्वात वेगवान रेल्वे आहे. येणाऱ्या काही दशकांत ब्रिटन हा भारताचा सर्वात जवळचा आणि विश्वासू मित्र असेल. भारत ब्रिटनला मागे टाकत जगातील पाचवी अर्थव्यवस्था बनला आहे. तसेच, महामारीच्या काळात सिरम इन्स्टिट्युटने ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि अ‍ॅस्ट्राझेनेकासह कोट्यावधी लसींची निर्मिती केली. यावरून भारत ताकदवान होत असल्याचं दिसतं आहे,” असं लॉर्ड करण बिलिमोरिया म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-01-2023 at 13:36 IST

संबंधित बातम्या