The Kerala Story Kashmir Files Dhurandhar Mention by PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केरळच्या तिरुवल्ला येथे एका जाहीर सभेला संबोधित करत असताना काँग्रेस आणि डाव्या पक्षांवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी तीन चित्रपटांचा उल्लेख करत म्हटले की, विरोधी पक्ष खोटे बोलण्यात बरेच पारंगत आहेत. त्यांनी देशाची दिशाभूल करण्याचे काम केले.
धुरंधर ते केरळ फाइल्सचा उल्लेख
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेषकरून तीन चित्रपटांचा उल्लेख केला. ते म्हणाले, “एलडीएफ आणि यूडीएफ (केरळमधील डावे पक्ष) खोटे बोलण्यात तरबेज आहेत. ते केरला स्टोरी चित्रपटा खोटा आहे म्हणतात, काश्मीर फाइल्स आणि धुरंधरलाही ते खोटे ठरवतात.” विरोधकांवर टीका करताना ते पुढे म्हणाले की, विरोधकांनी खोटे बोलण्याचा उद्योग सुरू केला आहे. त्यांनी परकीय योगदान (नियमन) कायदा (FCRA) आणि समान नागरी संहिता (UCC) मधील सुधारणांवरून जनतेची दिशाभूल केली.
विरोधीक एफसीआरए आणि यूसीसीबद्दल खोट्या गोष्टी पसरवत आहेत. सीएएबद्दलही सुरूवातीला असेच खोटे पसरवत आले होते, मात्र आता हा कायदा लागू झाला असून यामुळे देशाचे कोणतेही नुकसान झालेले नाही. यूसीसी कित्येक वर्षांपासून गोव्यात लागू आहे आणि तिथेही कोणतीही समस्या नाही, असेही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.
काँग्रेसमुळे आखाती देशातील केरळी लोक धोक्यात
केरळमधील आणखी एका सभेला संबोधित करत असताना पंतप्रधान मोदींनी आखाती देशातील युद्धाचा उल्लेख करून काँग्रेसवरही जोरदार टीका केली ते म्हणाले, काँग्रेस पक्ष भारतात प्रक्षोभक विधाने करत असल्यामुळे इराण आणि आखाती देशात राहणाऱ्या सुमारे एक कोटी भारतीय स्थलांतरितांचे जीव धोक्यात आले आहेत.
Kerala Polls:
— News Arena India (@NewsArenaIndia) April 4, 2026
"LDF, UDF spreading lies about FCRA, CAA, Kashmir Files, Kerala Story; it has become their habit."
– PM Modi in Thiruvalla pic.twitter.com/lKCfM9hW9y
निवडणुकीत लाभ मिळवण्यासाठी काँग्रेस भारतीय स्थलांतरितांची सुरक्षा धोक्यात घालत आहेत. काँग्रेसच्या बेजबाबदार विधानांमुळे मध्यपूर्वेतील भारताच्या मजबूत स्थानाला धक्का पोहोचू शकतो, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
तमिळनाडू, गोवा, केरळ, तेलंगण आणि पुद्दुचेरीमधील अनेक मच्छिमार इराणमध्ये काम करतात. सध्या ते धोक्यात असून त्यांना वाचविण्यासाठी सरकार सक्रियपणे प्रयत्न करत आहे. शेकडो जणांना आधीच सुखरूप भारतात आणले गेले आहे. सर्वांचेच जीवन आमच्यासाठी मौल्यवान आहे. काँग्रेसने मात्र स्वार्थी राजकारण केले, याबद्दल त्यांनी केरळवासीयांची माफी मागायला हवी, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
पश्चिम आशियातील देशांनी भारताला शत्रू म्हणून पाहावे, अशी काँग्रेसची इच्छा आहे, असाही आरोप पंतप्रधानांनी पुढे केला.
