हवाहवामान बदल आणि कुपोषणाच्या दुहेरी आव्हानांना तोंड देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतीय कृषी संशोधन परिषदेने (ICAR) विकसित केलेल्या विशेष गुण असलेल्या ३५ पिकांचे वाण लाँच केले. आयसीएआर संस्था, राज्य आणि केंद्रीय कृषी विद्यापीठे आणि कृषी विज्ञान केंद्र येथे आयोजित व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे नवीन पीक वाण देशाला समर्पित करण्यात आले. पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, २०२१ मध्ये हवामानातील लवचिकता आणि उच्च पोषक घटकांसारखे विशेष गुण असलेल्या या नवीन ३५ पीक जाती विकसित केल्या गेल्या आहेत.

यामध्ये दुष्काळ सहन करू शकणारे चणे, तूर, लवकर पिकणारे सोयाबीनचे वाण, तांदळाची रोग प्रतिरोधक वाण, गहू, मोती बाजरी, मका आणि चणे, क्विनोआ, बकव्हीट, विंगड बीन आणि फॅबा बीन यांचा समावेश आहे. या विशेष गुणांच्या पिकांच्या जातींमध्ये काही पिकांमध्ये आढळणाऱ्या पोषणविरोधी घटकांचाही समावेश आहे जे मानवी आणि प्राण्यांच्या आरोग्यावर विपरित परिणाम करतात.

यावेळी बोलताना केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर म्हणाले की, “देशातील ८६ टक्के शेतकरी हे छोटे शेतकरी आहेत आणि पंतप्रधानांचे लक्ष या शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे हे आहे. पंतप्रधानांचा असा विश्वास आहे की शेतकऱ्यांनी इतरांच्या दयेवर अवलंबून न राहता स्वतःच्या पायावर हिमतीनं उभं राहावं, यासाठी पीएम-किसान आणि किसान रेल्वेच्या माध्यमातून वाहतूक सुविधा देणाऱ्या अनेक योजना सुरू केल्या आहेत. बियाणापासून ते बाजारापर्यंत, त्यांचे उत्पन्न दुप्पट होण्यासाठी आणि शेती क्षेत्रात भारताला स्वावलंबी बनवण्यासाठी योगदान देण्यासाठी सुविधा पुरवल्या जात आहेत,” असेही तोमर म्हणाले.