Narendra Modi Instagram Followers Record: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इन्स्टाग्रामवर १० कोटी फॉलोअर्सचा टप्पा गाठून जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. इन्स्टाग्रामवर १० कोटी फॉलोअर्सचा टप्पा गाठणारे ते पहिले जागतिक राजकीय नेते ठरले आहेत. नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता सोशल मीडियावर देखील वाढली असल्याचे यातून दिसून येते. फॉलोअर्सच्या बाबतीत नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना देखील मागे टाकले आहे.
सोशल मीडियावर सक्रिय
नरेंद्र मोदी सर्वच सोशल मीडिया फ्लॅटफॉर्मवर सक्रिय असतात. त्यांच्या सोशल मीडिया एक्स (पूर्वीचे ट्विटर) , इन्स्टाग्राम आणि फेसबुक खात्यांवर मोठ्या प्रमाणावर नेटकरी एन्गेजमेंट करत असतात. इन्स्टाग्रामवर त्यांच्या पोस्ट आणि व्हिडिओजना खूप लाईक्स आणि शेअर मिळतात. २०१४ पासून पंतप्रधानपदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर मोदींची सोशल मीडियावरील हजेरी वाढल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे नरेंद्र मोदी इन्स्टाग्रामवर कोणालाही फॉलो करत नाहीत. त्यांच्या खात्यावर आत्तापर्यंत १२०५ पोस्ट करण्यात आल्या आहेत.
नरेंद्र मोदींना कोणत्या सोशल मीडिया फ्लॅटफॉर्मवर किती फॉलोअर्स?
| Social Platform | Followers |
| X (Twitter) | १०६.२ दशलक्ष |
| १०० दशलक्ष | |
| ५४ दशलक्ष | |
| LinkdIn | ५३.११ लाख |
इतर राजकीय नेत्यांना किती फॉलोअर्स आहेत?
एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, ब्राझीलचे अध्यक्ष लुला आणि तुर्कियेचे अध्यक्ष एर्दोगान यांच्यासह अनेक जागतिक नेत्यांना फॉलोअर्सच्याबाबतीत मागे टाकले आहे.
| नेता | फॉलोअर्स |
| डोनाल्ड ट्रम्प (अमेरिका राष्ट्राध्यक्ष) | ४३.२ दशलक्ष |
| प्रबोवो सुबियांतो (इंडोनेशिया अध्यक्ष) | १५ दशलक्ष |
| लुला (ब्राझीलचे अध्यक्ष) | १४.४ दशलक्ष |
| एर्दोआन (तुर्कियेचे अध्यक्ष) | ११.६ दशलक्ष |
| जेवियर मयाली (अर्जेंटिनाचे अध्यक्ष) | ६.४ दशलक्ष |
मोदींच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा अधिकृत कार्यक्रमांची झलक, आंतरराष्ट्रीय भेटी, सार्वजनिक उपक्रम, सांस्कृतिक क्षण आणि वैयक्तिक विचार पोस्ट करण्यासाठी केला जातो. या पोस्ट आणि व्हिडिओ नेटकर लाईक्स आणि शेअर करत असतात.

