scorecardresearch

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मातोश्री हिराबेन मोदी रुग्णालयात दाखल; मोदी अहमदाबादला जाण्याची शक्यता

हिराबेन मोदी यांचा जन्म १८ जून १९२३ रोजी झाला असून याच वर्षी त्यांनी वयाची शंभरी पूर्ण केली

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मातोश्री हिराबेन मोदी रुग्णालयात दाखल; मोदी अहमदाबादला जाण्याची शक्यता
अहमदाबादमधील रुग्णालयात केलं दाखल (फोटो – ट्वीटरवरुन साभार)

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मातोश्री हिराबेन यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. जून महिन्यामध्ये वयाची शंभरी ओलांडलेल्या हिराबेन यांना अहमदाबादमधील यूएन मेहता रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आल्याचं वृत्त ‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेच्या हवाल्याने ‘हिंदुस्तान टाइम्स’नं नं दिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आईला भेटण्यासाठी अहमदाबादला जाण्याची शक्यता आहे.

याच माहिन्याच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या आईची भेट घेतली होती. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यातील प्रचारानिमित्त मोदी गुजरातमध्ये होते तेव्हा त्यांनी आईची भेट घेतली होती. याच निवडणुकीमध्ये हिराबेन यांनी मतदानही केलं.

पंतप्रधान मोदींच्या मातोश्री रुग्णालयात दाखल झाल्यानंतर राहुल गांधींचं ट्वीट, म्हणाले “एका आई आणि मुलामधील प्रेम…”

हिराबेन मोदी यांचा जन्म १८ जून १९२३ रोजी झाला. पंतप्रधान मोदींच्या आईने वयाची शंभरी पूर्ण केली. या पार्श्वभूमीवर आनंद व्यक्त केला होता. “मला अजिबात शंका नाही की माझ्या आयुष्यात जे काही चांगलं घडलं आहे किंवा माझ्या व्यक्तीमत्वामधील चांगल्या गोष्टी या माझ्या पालकांकडूनच आल्या आहेत. आज मी इथे दिल्लीमध्ये बसलो असलो तरी अनेक आठवणी जाग्या झाल्या आहेत,” असं मोदी म्हणाले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-12-2022 at 14:01 IST

संबंधित बातम्या